Parbhani Rain : सोयाबीनला फुटले अंकुर; कापूस, तुरीचे मोठे नुकसान

सद्यस्थितीत सोयाबीन, कापूस, तूर इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
Parbhani Rain
Parbhani Rain : सोयाबीनला फुटले अंकुर; कापूस, तुरीचे मोठे नुकसान File Photo
Published on
Updated on

Soybean sprouts; Major damage to cotton, tur

ताडकळस, पुढारी वृत्तसेवा: परिसरातील धानोरा काळे, कळगाव, फुलकळस, माखणी, खांबेगाव, महागाव, कळगाववाडी, बलसा बु., एकरुखा, मुंबर, माहेर, बानेगाव, गोळेगाव, देऊळगाव दु, खंडाळा, मजलापूर, निळा आदी गावांतील शिवारात १५ ऑगस्टला ढगफुटीसदृश पाऊस झाला. नंतर चारवेळा अतिवृष्टी झाली. यातच दि. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी मेघगर्जनेसह पाऊस झाला. यामुळे गोदावरी नदीसह छोटे-मोठे ओढे दुथडी भरून वाहत आहेत. सद्यस्थितीत सोयाबीन, कापूस, तूर इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कापलेले सोयाबीन पावसाने वाह्न गेले तर उभे सोयाबीन शेंगांना अंकुर फुटले.

Parbhani Rain
Anandacha Shidha Yojana : सण आले पण आनंदाचा शिधा मिळेना

गोदावरीवरील धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्याने दिग्रस बंधाऱ्याचे दरवाजे उघडले. पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात विष्णुपुरी प्रकल्पात होत आहे. नगदी पीक कापूस चांगल्या प्रकारे बोंड फुटून वेचणीस आले होते, परंतु सततच्या पावसाने नुकसान झाले. सोयाबीन काढणीला आले असतानाच पावसाच्या फटक्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले. प्रशासनाने नुकसानीची पाहणी केली, परंतु अक्षेप पंचनामे झाले नाहीत.

शेतात काहीच शिल्लक राहिले नाही. त्यामुळे सरसकट क्षेत्राचे नुकसान धरून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. परिसरातील शिव- ारात महिनाभरापासून जोरदार पावसाने सोयाबीन, कापूस, तूर पिकांचे मोठे नुकसान झाले. याची पाहणी दि. २५ सप्टेंबर रोजी पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आ. डॉ. रत्नाकर गुट्टे, पाथरीचे आ. राजेश विटेकर, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसीलदार माधव बोथीकर, तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव यांनी करून शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याचे आश्वासन दिले. परंतु अद्याप ठोस निर्णय दिसत नाही. यातच रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जे शिल्लक होते तेही गेले. सरकारने घोषणा न करता भरीव भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी अॅड. दिनेश काळे यांनी केली.

Parbhani Rain
Parbhani Cloudburst : परभणी जिल्ह्यात पुन्हा ढगफुटी, सखल भाग जलमय; शेकडो घरांत पाणी, शिल्लक पिकेही पाण्यात

झरीसह परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतातील उभे सोयाबीनसह अन्य पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल बनला आहे. काही शेतकऱ्यांनी पावसाने उघडिप दिल्याने शेतकऱ्यांनी कापणीस आलेले सोयाबीन पीक काढण्यास सुरुवात केली होती, पण सोयाबीन शेतात अंथरण्यात आले : असतानाच अचानक सोमवारी पहाटे पावसाने हजेरी लावल्याने ते पीकही पाण्याखाली गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे पहावयास मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news