Somnath Suryavanshi murder case : सोमनाथ सूर्यवंशी खूनप्रकरणी अखेर एसआयटीची स्थापना

परभणीच्या एकाही अधिकाऱ्याचा पथकात समावेश नाही
Somnath Suryavanshi death case
Somnath Suryavanshi : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी एसआयटी File Photo
Published on
Updated on

SIT finally formed in Somnath Suryavanshi murder case

परभणी, पुढारी वृत्तसेवा : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली असून, त्या पथकात परभणीतील एकाही पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्याचा समावेश नाही. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी याबाबतचे आदेश जारी केले.

Somnath Suryavanshi death case
Shaktipeeth Highway News : शक्तिपीठ महामार्गाला शेतकर्‍यांचा विरोध कायमच !

परभणी शहरात दि.१० डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती. तदनंतर दि.११ डिसेंबर रोजी शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. शहरात बंददरम्यान उसळलेल्या हिसाचारानंतर पोलिस कोठडीत झालेल्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दोषी पोलिस अधिकाऱ्यांविरुध्द गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय अंतिम ठेवत दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. यानंतर अज्ञात पोलिस अधिकार्याविरुध्द नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येऊन प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेशन विभागाकडे सोपविण्यात आला होता.

Somnath Suryavanshi death case
Parbhani News : दारूबंदीसाठी एकवटल्या महिला

सुधीर हिरेमठ पथकाचे प्रमुख

सीआयडीचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ हे या पथकाचे प्रमुख आहेत. पथकात नागपूर सीआयडीचे पोलिस अधीक्षक अभिजीत धाराशिवकर, नांदेड सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक अनिल गव्हाणकर यांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे तपासणी पथकामध्ये जिल्ह्यातील एकही अधिकारी अथवा कर्मचारी राहणार नाही, असे निर्देश राज्य पातळीवरून देण्यात आल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news