Parbhani News : दारूबंदीसाठी एकवटल्या महिला

तालुक्यातील सिंगणापूर व सिंगणापूर फाटा येथे उघडपणे होत असलेली अवैध दारु विक्री तात्काळ बंद करण्यासाठी महिला एकवटल्या
Parbhani News
Parbhani News : दारूबंदीसाठी एकवटल्या महिला File Photo
Published on
Updated on

Parbhani Women united for alcohol prohibition

परभणी, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील सिंगणापूर व सिंगणापूर फाटा येथे उघडपणे होत असलेली अवैध दारु विक्री तात्काळ बंद करण्यासाठी महिला एकवटल्या असुन गुरूवारी (दि.२२) प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलींग बोधने यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांची भेट घेत दारु बंदीची मागणी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी महिलांचा सन्मान करण्याचे सोडत त्यांनाच उलट प्रश्नांची सरबत्ती केल्याचा आरोप प्रहारचे जिल्हाध्यक्ष बोधने यांनी केला.

Parbhani News
Gramsevak Caught Red Handed | एका सहीसाठी मागितली लाच; तक्रारदाराच्या तक्रारीनंतर ग्रामसेविकेला रंगेहाथ पकडले

सिंगणापूर येथील महिला - सरपंचासह पोलीस पाटील व - जवळपास ४५ महिलांनी सिंगणापूर व सिंगणापूर फाटा येथील अवैधरित्या - होणारी दारू विक्री बंद करावी या - मागणीसाठी अप्पर पोलीस अधिक्षक यांच्या कक्षात परभणी ग्रामीणचे - पोलीस उपविभागीय अधिकारी देशमुख यांची भेट घेत निवेदन सादर केले. सिंगणापूर फाटा व सिंगणापूर - गावात होत असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे तरुण व अल्पवयीन मुलांना दारुचे व्यसन लागले आहे. अनेकवेळा महिलांनी तक्रारी करूनही अवैध दारू विक्री बंद होत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पानठेले, छोटी मोठी दुकाने, ढाबे व खाजगी व्यक्तीकडून अवैधरीत्या उघड उघड दारू विक्री केली जात आहे. गावात दारु उपलब्ध होत असल्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडले असुन महिलांना मारहाण करणे, रस्त्यावर भांडणे करणे प्रकार वाढले असुन यामुळे शाळकरी मुलांसह महिला, मुलींना त्रास होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Parbhani News
Soybean Crop Damage | पूर्णा तालुक्यात अतिवृष्टीचा फटका: सोयाबीन पिवळे पडून बाधित; नुकसान भरपाई मिळण्याबाबत शेतकरी साशंक

पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांनी तक्रारदार महिलांवरच प्रश्नांची सरबत्ती केली. दारूविक्रेत्यांची नावे सांगा, त्यांचे मोबाईल नंबर द्या, आम्ही तुमच्या घरी आल्यानंतर दारू विक्रेत्यांची घरे दाखवा असे उलट प्रश्न परभणी ग्रामीणचे पोलिस उपविभागीय अधिकारी चंद्रसेन देशमुख यांनी केल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांनी केला आहे. सिंगणापूर येथील दारूबंदी प्रश्नी लवकरच पोलिस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांची भेट घेणार असल्याचे बोधने यांनी पुढारीशी बोलताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news