जिंतूरमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

“जय जिजाऊ, जय शिवराय”च्या घोषणांनी शहर दुमदुमले
parbhani news
जिंतूरमध्ये शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा file photo
Published on
Updated on

Shiv Jayanti celebrated with enthusiasm in Jintur

जिंतूर : पुढारी वृत्तसेवा

आज दि.19 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिंतूर शहरात सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शहरातील विविध भागांत ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांनी सजलेल्या परिसरात आणि “जय जिजाऊ, जय शिवराय”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.

parbhani news
‌Parbhani News : ‘त्या‌’ पर्यवेक्षकाचा अहवाल शिक्षण विभागास देणार

शिवरायांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मा. उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, नगरसेवक तथा न. प. गटनेते अशोक बंड, नगरसेवक जाबेर भाई मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांनी आपल्या भाषणातून शिवरायांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्वराज्य संकल्पनेचा, शौर्य, पराक्रम व न्यायनिष्ठ प्रशासनाचा आदर्श आजच्या पिढीने आत्मसात करावा, असे आवाहन केले. शिवरायांचे जीवनचरित्र हे केवळ इतिहास नसून प्रेरणादायी आदर्श आहे, असेही त्यांनी नमूद केले.

parbhani news
Parbhani News : कौसडीत अवतरले 'रयतेचे राजे'! ३९६ विद्यार्थ्यांनी १२०० चौ. फुटांत साकारली शिवरायांची भव्य प्रतिकृती

कार्यक्रमादरम्यान शिवचरित्रावर आधारित प्रभावी भाषणे, पोवाडे व सांस्कृतिक सादरीकरणे सादर करण्यात आली. युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उत्सवात रंगत आणली. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहून कार्यक्रमाला ऐतिहासिक व सांस्कृतिक स्वरूप दिले.

शहरातील विविध सामाजिक संघटना, मंडळे व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत उत्सव यशस्वी केला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकमुखाने “जय जिजाऊ, जय शिवराय”चा नारा देत शिवरायांच्या आदर्शांनुसार समाजकार्यात योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला. एकूणच, जिंतूर शहरातील यंदाची शिवजयंती भक्तीभाव, उत्साह आणि ऐतिहासिक अभिमानाच्या वातावरणात संपन्न झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news