Parbhani Shelgaon police crack down on illegal gutkha| गुटख्याच्या काळ्या धंद्यावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक

शेळगावात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक उघड; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Parbhani Shelgaon police crack down on illegal gutkha
Parbhani Shelgaon police crack down on illegal gutkha
Published on: 
Updated on: 

सोनपेठ, पुढारी वृत्तसेवा : शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध परभणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील शेळगाव येथील बसस्थानक परिसरात मंगळवारी (दि.१७) पोलिसांनी धडक कारवाई करत बोलेरो पिकअप वाहनातून वाहतूक केला जाणारा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत वाहनासह तब्बल १० लाख ९७ हजार ९३६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, या कारवाईमुळे अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक आणि सोनपेठ पोलीस ठाण्याचे पथक अवैध व्यवसायांवर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, मंगळवारी पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना सोनपेठ तालुक्यातील शेळगाव बसस्थानकाजवळून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयित बोलेरो पिकअप क्र. एमएच २२ एएन १९६१ वाहनाची तपासणी केली. यावेळी वाहनामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला विविध कंपन्यांचा गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.

या प्रकरणी बालाजी वैजनाथराव काळे (रा. शेळगाव, ता. सोनपेठ) आणि अरबाज खान मोबीन खान (रा. गंगाखेड) यांच्याविरुद्ध सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक नेमकी कुठून केली जात होती आणि या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई संदीप आशोकराव चौरे यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली.

Parbhani Shelgaon police crack down on illegal gutkha
Parbhani Water Supply : परभणी जिल्ह्यासाठी जायकवाडी धरणातून ४ आवर्तने पाणी सोडणार

या पथकात पोलीस हेडकॉन्स्टेबल गोविंद वड, रामकिशन काळे, देविदास बुकरे, पोलीस शिपाई शरद सावंत, वाहनचालक संदीप साळवे यांचा समावेश होता. तसेच पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक टर्के, पोलीस हेडकॉन्स्टेबल चुडावकर, यशवंत वाघमारे, वाव्हळे, सोनपेठ ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जगदीश मेहेत्रे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अशोक गीत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि जगदीश मेहेत्रे हे करीत आहेत.

Parbhani Shelgaon police crack down on illegal gutkha
Parbhani Water Supply : परभणी जिल्ह्यासाठी जायकवाडी धरणातून ४ आवर्तने पाणी सोडणार

पाच लाखांचे वाहनही जप्त : पोलिसांनी पंचांसमक्ष

जप्त करण्यात आलेल्या मालाची मोजणी केली. यामध्ये केसरयुक्त विमल पानमसाल्याचे विविध पॅक, काळ्या रंगाचे तंबाखू पुडे, किंग पॅक तंबाखूचा समावेश आहे. साठ्यासह वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी बोलेरो पिकअपदेखील जप्त केली. या वाहनाची किंमत ५ लाख असून, सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १० लाख ९७ हजार ९३६ रुपये असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.