Lok sabha Election 2024 Results : परभणीचे ‘बॉस’ संजय जाधवच; परभणीकर ठाकरेंच्या पाठीशी ठाम…

Lok sabha Election 2024 Results : परभणीचे ‘बॉस’ संजय जाधवच; परभणीकर ठाकरेंच्या पाठीशी ठाम…

[author title="प्रवीण देशपांडे " image="http://"][/author]

परभणी; दोन वेळा आमदारकी व दोन वेळा खासदारकी भूषविल्यानंतर लोकसभेत जाणारे संजय उर्फ बंडू जाधव हेच खरे शिवसेनेच्या बालेकिल्ल्याचे बॉस ठरले आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना येथील जनतेने नाकारल्याची चित्र समोर आले आहे.

एका सामान्य शेतकरी कुटुंबातून शिवसैनिक म्हणून पुढे आलेले बंडू जाधव हे गेल्या 35 वर्षापासून शिवसेनेच्या कार्यात सक्रिय आहेत. 1996 मध्ये पालिकेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर 2001 मध्ये ते नगरसेवक झाले. 2003 मध्ये पक्षाने त्यांना जिल्हाप्रमुख पद बहाल केले. पाठोपाठ 2004 च्या विधानसभा निवडणुकीत निवडणुकीतून ते पहिल्यांदा विधानसभेत दाखल झाले. 2009 मध्ये देखील या विजयाची परंपरा त्यांनी कायम राखली.

दोन वेळच्या विधानसभेनंतर 2014 मध्ये शिवसेनेने त्यांना प्रमोशन देत लोकसभेच्या रिंगणात उतरविले. तेथेही विजयश्री संपादन करण्याचे काम त्यांनी केले. 2019 च्या निवडणुकीतही संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश विटेकर यांचा पराभव करीत विजयाची परंपरा कायम राखली. जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांना पराभूत करीत हा सामान्य शिवसैनिक प्रस्थापित राजकारणी झाला. याही वेळी महायुतीने त्यांच्या विरोधात रास पचे अध्यक्ष महादेव जानकर यांना निवडणूक रिंगणात उतरून पूर्ण रसद पुरविण्याचा प्रयत्न केला.

जातीची समीकरणे मोठ्या प्रमाणावर मांडली गेली. त्याचवेळी जरांगे इफेक्ट व मोदींबद्दलचे नकारात्मकता याबद्दल यातून मराठा व मुस्लिम समाजासह दलित समाजानेही त्यांना भरभरून मतदान केले. याचाच परिणाम म्हणून बंडू जाधव हे तब्बल एक लाख 35000 च्या मताधिक्याने आघाडीवर आहेत त्यांचा विजय हा निश्चित आहे त्यामुळे बॉस या नावाने परिचित असलेल्या बंडू जाधव यांनी आपणच खरे परभणीचे बॉस असल्याचा प्रत्यय आणून दिला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news