लोकोपायलट, गार्डच्या सोयीसुविधेसाठी रेल्वे प्रशासन तत्पर: राजेंद्रकुमार मीना

Indian Railway | पूर्णा येथे मीडिया टूरचे आयोजन
crew facilities Indian Railways
पूर्णा येथील रनिंग रुम येथे मीडिया टूरचे आयोजन Pudhari Photo
Published on
Updated on

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: पूर्णा येथील रेल्वे रनिंग क्रू बुकिंग निवासस्थानातील रनिंग स्टाफ, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर तथा रेल्वे चालक व गार्ड यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा, सुरक्षितेविषयी घेतली जाणारी काळजी आणि रनिंग स्टाफ सबंधी इतर बाबींची माहिती रेल्वे प्रवाशी व जनतेस कळावी, याकरीता आज (दि.२१) मीडिया टूर आयोजित केली होती. (Indian Railway)

यावेळी नांदेड विभाग दक्षिण- मध्य रेल्वेचे अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेंद्रकुमार मीना यांनी पूर्णा येथील रनिंग रुम येथे आज दुपारी १२ वाजता पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वरिष्ठ यांत्रिकी अभियंता परममित्र, जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी मीना पुढे म्हणाले की, रेल्वे चालवताना व गुड्स ट्रेन चालविताना रेल्वे लोको पायलट यांच्यावर मोठी जबाबदारी असते. त्याचबरोबर गार्डवर देखील मोठी जबाबदारी असते. त्यामुळे त्यांच्या फिटनेसकडे जास्त लक्ष दिले जाते. यासाठी रनिंग रुममध्ये त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध केलेल्या असतात. रुम वातानुकूलित ठेवलेली असते. पिण्याचे शुद्ध पाणी, स्नानगृह, किचन रुमची व्यवस्था असते. नाश्ता, जेवण उच्च दर्जाचे दिले जाते. तसेच वैद्यकीय उपचारांची सोयही उपलब्ध असते. त्याचबरोबर तक्रार बुकची तत्काळ दखल घेऊन समस्या सोडविल्या जातात.

यावेळी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या समस्यांचा मीना यांनी फॉलोअप घेतला.

crew facilities Indian Railways
परभणी : तलावात बुडून मच्छीमार तरुणाचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news