Purna News | कोण होणार पूर्णा पालिकेचा उपनगराध्यक्ष? मंगळवारी होणार निवड; उत्सुकता शिगेला!

यशवंत सेनेचे ७ नगरसेवक निवडून आल्यामुळे बहुमत : तर दोन स्विकृत सदस्यांचीही होणार निवड
 Purna News
पूर्णा नगरपरिषद
Published on
Updated on

आनंद ढोणे

पूर्णा: येथील पूर्णा नगरपरिषद सार्वत्रिक २०२५ निवडणूक ही २१ डिसेंबर रोजी निकाल लागून पार पडली. त्‍यामध्ये यशवंत सेनेच्या थेट जनतेतून नगराध्यक्षा सौ विमलबाई कदम या निवडून आल्या. तर नगरसेवक पदी यशवंत सेना ७, काँग्रेस ६, शिवसेना उबाठा २,शिंदे शिवसेना २,भाजपा २,जनता दल सेक्युलर २,पूर्णा विकास आघाडी २ असे पक्षिय बलाबल राहीले.आता वेध लागले आहेत ते एक उपनगराध्यक्ष व दोन स्विकृत सदस्य निवडीचे.

येत्या १३ जानेवारी मंगळवार रोजी पालीकेची पहिली सर्वसाधारण सभा घेतली जाणार आहे. तशी अधिकृत माहिती पालिका सुत्रांकडून प्राप्त झाली असून सभेत उपस्थित नगरसेवकातून बहुमताने एक उपनगराध्यक्ष तर दोन स्विकृत सदस्य निवडले जातील. यामध्य एकूण २३ सदस्यांपैकी यशवंत सेनेचे ७ नगरसेवक निवडून आल्यामुळे बहुमत त्यांच्या बाजूने आहे. त्यामुळे यशवंत सेनेचाच उपनगराध्यक्ष निवडून येवू शकतो.

 Purna News
Purna News | पूर्णेत कंत्राटदाराने पाडली आंबेडकर सभागृहाची संरक्षक भिंत; नागरिकांमध्ये संताप

त्याच बरोबर त्यांचा एक स्विकृत सदस्य निवडला जाईल. शिवाय दुसरा स्विकृत सदस्य उर्वरित नगरसेवकांच्या बहुमत पसंतीने निवडला जाईल.त्यामध्य काँग्रेस पक्षाचा एक स्विकृत सदस्य निवडला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. किंवा उर्वरित ईतर नगरसेवकांच्या पसंतनी दुसरा कोणी निवडला जातो काय? हे मंगळवारीच कळेल. एकंदरीत सदरील नगरपरिषदेसाठी ता १३ जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष व दोन स्विकृत सदस्य निवडले जाण्याचे ठरल्यामुळे बहुमतातील यशवंत सेनेच्या एकूण ७ सदस्यांपैकी एक दोन नावे समोर येत आहेत.

 Purna News
Ratnakar Gutte | पूर्णा शहराचा सर्वांगीण विकासातून कायापालट करणार : आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

परंतू, नक्की कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे? हे सध्या गोपनीय ठेवले आहे. त्यासाठी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांचा सल्ला घेवूनच उपनगराध्यक्ष आणि एक स्विकृत सदस्य यांची निवड केली जाईल. तसेच नवनिर्वाचित नगरसेवकातून बहुमताने इतर पक्षाचा एक स्विकृत सदस्य निवडला जाणार आहे. या निवडीसाठी नगराध्यक्ष, नूतन नगरसेवक व कार्यकर्ते मंडळी यांच्यात मागील काही दिवसापासून गुप्त सल्लामसलतीचे खलबत चालू आहेत. दरम्यान,असे असताना कोण होणार पूर्णा पालिकेचा उपनगराध्यक्ष व दोन स्विकृत सदस्य? याकडे शहरवासीय नागरिकांचे लक्ष लागले असून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news