Nagar Parishad Election Result 2025 | पूर्णा पालिकेच्या निकालाने राजकीय समीकरणे बदलली

Nagar Parishad Election Result 2025 | पूर्णा नगरपरिषदेवर आ. रत्नाकर गुट्टे यांचे वर्चस्व सिद्ध तर नगराध्यक्षपदी यशवंत सेनेच्या विमलबाई कदम यांचा विजय
Nagar Parishad Election 2025
Nagar Parishad Election 2025
Published on
Updated on

पूर्णा : आनंद ढोणे

येथील नगरपरिषद सार्वत्रिक २०२५ निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी दुपारी तहसील कार्यालयात घोषित करण्यात आला. यामध्ये थेट जनतेतून निवडल्या जाणाऱ्या नगराध्यक्षपदासाठी यशवंत सेना तसेच आ. डॉ. रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाच्या सौ. विमलबाई लक्ष्मणराव कदम यांनी ३२४ मतांची आघाडी घेत विजय मिळवला.

Nagar Parishad Election 2025
Hupari Nagarparishad Result 2025 | हुपरी नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचा एकतर्फी विजय

विमलबाई कदम यांना एकूण ६,७७४ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेना (उबाठा) गटाच्या प्रेमला संतोष एकलारे यांना ६,४५० मते पडली. काँग्रेसच्या शेख हसीना बेगम यांना ५,४८१ मते मिळाली. अत्यंत चुरशीच्या लढतीत अखेर यशवंत सेनेच्या विमलबाई कदम यांनी विजयाची बाजी मारली.

या निकालामुळे पूर्णा नगरपरिषदेवर बंटीभाऊ उर्फ नितीन कदम यांच्या नेतृत्वाखाली आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले असून, आता शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मतदारांनी मोठी संधी दिल्याचे चित्र आहे.

११ प्रभागांतील एकूण २३ विजयी सदस्य पुढीलप्रमाणे —

प्रभाग क्रमांक १
अ) अहमद जोहराबीन गौस – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
ब) कुरेशी जाकीर रहीमोद्दीन – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

प्रभाग क्रमांक २
अ) होळकर मिरा विश्वनाथ – यशवंत सेना
ब) कदम लक्ष्मीकांत गंगाराम – भाजप

प्रभाग क्रमांक ३
अ) पंडित राजनंदिनी दादाराव – शिवसेना (उबाठा)
ब) कुरेशी शेख रऊफ शे. महेबुब – शिवसेना (उबाठा)

प्रभाग क्रमांक ४
अ) खंदारे उत्तम मुगाजी – पूर्णा शहर विकास आघाडी
ब) जोंधळे जनाबाई ज्ञानोबा – पूर्णा शहर विकास आघाडी

प्रभाग क्रमांक ५
अ) भोळे मुकूंद विठ्ठलराव – यशवंत सेना
ब) कांबळे अर्चना मिलिंद

प्रभाग क्रमांक ६
अ) कुलदिपके वंदना सत्यभान – काँग्रेस
ब) मुजीब अब्दुल हबीब – यशवंत सेना

प्रभाग क्रमांक ७
अ) भालेराव लक्ष्मीबाई विष्णूकांत – यशवंत सेना
ब) कदम मिनाक्षीबाई विजयकुमार – शिवसेना (शिंदे गट)

प्रभाग क्रमांक ८
अ) सोळंके प्रेमला भगवान – भाजप
ब) कदम पूजा सचिन – शिवसेना (शिंदे गट)

प्रभाग क्रमांक ९
अ) एंगडे पदमीनबाई नामदेव – काँग्रेस
ब) खुरेशी हाजी खलील – काँग्रेस
क) शमीम बेगम शरीफ – काँग्रेस

प्रभाग क्रमांक १०
अ) भोसले कौशल्या मारोती – यशवंत सेना
ब) जाधव सुनील लक्ष्मण

प्रभाग क्रमांक ११
अ) कांबळे प्रकाश बन्सी – जनता दल सेक्युलर
ब) खर्गखराटे रेखा अनिल – जनता दल सेक्युलर

Nagar Parishad Election 2025
Nagar Parishad Election Result 2025 | रोहा अष्टमी नगरपरिषदेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम

पक्षीय बलाबल पुढीलप्रमाणे

यशवंत सेना – ७
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ६
शिवसेना (उबाठा) – २
भाजप – २
शिवसेना (शिंदे गट) – २
जनता दल सेक्युलर – २
पूर्णा शहर विकास आघाडी – २

दरम्यान, मतमोजणी निकालानंतर विजयी उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. तसेच नगराध्यक्षपदासाठी निवडून आलेल्या यशवंत सेना उमेदवार सौ. विमलबाई कदम यांच्या विजयाची रॅली शहरातील मुख्य रस्त्यांवरून काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले.

तत्पूर्वी आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी तहसील कार्यालयात येऊन सर्व विजयी उमेदवारांचे स्वागत करत आगामी शहर विकासासाठी शुभेच्छा दिल्या. मतमोजणीदरम्यान निवडणूक अधिकारी माधवराव बोथीकर, प्रशांत थारकर व डॉ. उत्कर्ष गुट्टे यांच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने मतमोजणी करून निकाल जाहीर केला. या निवडणुकीत काही उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले, तर काहींना निसटता पराभव स्वीकारावा लागला. अखेर जनतेचा निर्णय सर्वांनी मान्य केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news