Parbhani Zilla Parishad|कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेचे उल्लंघन भोवले! सीईओंची जि.प.मध्ये एन्ट्री; अनुपस्थित ९३ कर्मचाऱ्यांना थेट नोटिसा

Parbhani ZP CEO surprise visit action - सीईओ नतिषा माथुर यांच्या अचानक पाहणीत कर्मचारी गैरहजर आढळले; कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेचे उल्लंघन भोवले
Parbhani Zilla Parishad
Parbhani Zilla ParishadPudhari photo
Published on: 
Updated on: 

परभणी : जिल्हा परिषद कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेळेवर उपस्थितीबाबत प्रशासनाने आता कडक भूमिका घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी नतिषा माथुर यांनी शुक्रवारी (दि.३०) सकाळी साडेनऊ वाजता जिल्हा परिषद कार्यालयात अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी विविध विभागांची पाहणी केली. या पाहणी दरम्यान मोठ्या संख्येने कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. साडेदहा वाजेपर्यंतही कार्यालयात दाखल न झालेल्या ९३ कर्मचाऱ्यांना झेडपीच्या प्रवेशद्वारासमोर उभे राहून हजेरी घेत कारणे दाखवा नोटिसा बजावल्या तर एका कर्मचाऱ्याला निलंबित केल्याने जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली.

मुख्य कार्यकारी अधिकारी नतिषा माथुर शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास जिल्हा परिषद कार्यालयात दाखल झाल्या. त्यानंतर सुमारे दहा वाजता त्यांनी कार्यालयातील विविध विभागांना अचानक भेटी देण्यास सुरुवात केली. कोणतीही पूर्वकल्पना न देता करण्यात आलेल्या या पाहणीमुळे विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची प्रत्यक्ष स्थिती समोर आली.

पाहणी दरम्यान काही विभागांमध्ये अपेक्षित संख्येने कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळून आले. कार्यालयीन कामकाजाची वेळ सुरू झाल्यानंतरही अनेक कर्मचारी कार्यालयात दाखल झाले नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची पुन्हा तपासणी केली. साडेदहा वाजेपर्यंतही कार्यालयात हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांची नोंद घेण्यात आली.

या प्रकाराची मुख्य कार्यकारी अधिकारी माथुर यांनी गंभीर दखल घेतली. कार्यालयीन वेळेचे पालन न करणे आणि विनाकारण उशिरा कार्यालयात दाखल होणे याबाबत संबंधितांकडून स्पष्टीकरण मागविण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार ९३ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असून, कार्यालयात उशिरा दाखल होण्याचे कारण स्पष्ट करून खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले.

जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील नागरिकांशी संबंधित विविध महत्त्वाची कामे केली जातात. विविध विभागांमध्ये दररोज मोठ्या संख्येने नागरिक आपल्या कामांसाठी येतात. अशावेळी अधिकारी-कर्मचारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहणे आणि नागरिकांची कामे वेळेत मार्गी लावणे अपेक्षित आहे. मात्र, अचानक पाहणीमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी गैरहजर आढळल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे.

सीईओंच्या या अचानक पाहणीमुळे जिल्हा परिषद कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्येही चर्चा सुरू झाली आहे. संबंधित ९३ कर्मचाऱ्यांकडून खुलासे प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये नमूद केलेल्या कारणांची प्रशासनाकडून छाननी केली जाणार आहे. खुलासे समाधानकारक नसल्यास संबंधितांवर नियमानुसार पुढील प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता आहे.

अचानक पाहणीचा धसका

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत यापुढेही अचानक पाहणी केली जाण्याची शक्यता आहे. कार्यालयीन वेळेचे काटेकोर पालन करण्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. सीईओ माथुर यांच्या अचानक पाहणीमुळे जिल्हा परिषद कार्यालयातील विविध विभागांमध्ये काही काळ चांगलीच धावपळ उडाली.

Parbhani Zilla Parishad
Parbhani sugarcane rate : गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी ऊस दर जाहीर करा

एक कर्मचारी निलंबित

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत हजेरी लावून थेट घरी गायब होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या प्रकाराबाबत माथुर यांनी यापूर्वीही कर्मचाऱ्यांना तंबी दिली होती. मात्र काही दिवस कारभार सुरळीत चालल्यानंतर पुन्हा परिस्थिती 'जैसे थे' झाली होती. यामुळे त्यांच्या चाणाक्ष नजरेतून ही बाब सुटली नाही. मात्र कर्मचाऱ्यांना त्यांची गाफिली भोवली. त्यातच आधीच विविध प्रकारच्या तक्रारी असलेल्या आरोग्य विभागाच्या कनिष्ठ लेखाधिकारी एस.आर. यन्नावार यांना उद्धट वागणुकीबद्दल थेट निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले.

Parbhani Zilla Parishad
Parbhani ganja cultivation raid - जिंतूर तालुक्यातील मोहखेड्यात चक्क गांजाची लागवड, तब्बल १०९ झाडे जप्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news