Parbhani Zilla Parishad : जिल्हा परिषदेच्या सभेत सदस्यांचा प्रश्नांचा भडिमार

मोडकळीस आलेल्या अंगणवाड्यांचे निरलेखन करा; जि.प. च्या जमिनी अन्य विभागांना देण्यास विरोध
Parbhani Zilla Parishad Building
Parbhani Zilla Parishad Building pudhari photo
Published on: 
Updated on: 

परभणी: जिल्हा परिषदेच्या मोडकळीस आलेल्या अंगणवाड्या, जि.प. मालकीच्या जमिनींचे संरक्षण, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा प्रलंबित अनुशेष आणि समाजकल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची अंमलबजावणी अशा विविध प्रश्नांवर शुक्रवारी (दि.27) झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांसह प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी सदस्यांनी आक्रमकपणे मांडली.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात अध्यक्षा लता वाकळे यांच्या अध्यक्षतेत ही सर्वसाधारण सभा झाली. सभेला उपाध्यक्ष श्रीकांत भोसले विटेकर, महिला व बालकल्याण सभापती ऐश्वर्या चव्हाण, समाजकल्याण सभापती पार्वतीबाई मुंडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती कौशल्याबाई शिंदे, शिक्षण व आरोग्य सभापती वैशाली आंबेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, अतिरिक्त सीईओ रश्मी खांडेकर यांच्यासह विविध विभाग अधिकारी उपस्थित होते.

Parbhani Zilla Parishad Building
Drought Management: दुष्काळावर मात करण्यासाठी शासनासोबत लोकसहभागही महत्त्वाचा!

ग्रामीण भागातील अनेक अंगणवाडी इमारतींची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, काही इमारती मोडकळीस आल्या. अशा इमारतींत बालकांना बसविणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे मोडकळीस आलेल्या अंगणवाडी इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांचे निरलेखन करावे, अशी मागणी जि.प. सदस्य माणिक हारकळ यांनी केली.

बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. सदस्य संग्राम जामकर यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे सभेचे लक्ष वेधले. 2005 ते 2023 या कालावधीतील ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचा अनुशेष भरून काढण्याची मागणी केली. तसेच जेएसडीए अंतर्गत कंत्राटी भरती करावी, अशी मागणीही त्यांनी मांडली. आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास पाणीटंचाईसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी प्रशासनाला मदत होईल, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जमिनी अन्य शासकीय विभागांना उपलब्ध करून देण्याच्या मुद्यावरही सभेत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. जिल्हा परिषदेने यापूर्वीच सार्वजनिक हितासाठी मोठ्या प्रमाणात जमिनी उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, भविष्यातील विकासकामे, विविध योजना आणि कार्यालयीन विस्तारासाठी जिल्हा परिषदेच्या उर्वरित जमिनी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे यापुढे जिल्हा परिषदेच्या जमिनींची मागणी करण्याऐवजी शासनाच्या संबंधित विभागांनी गायरान जमीन अथवा महानगरपालिका आणि नगर पालिकांच्या मालकीच्या पर्यायी जागांचा वापर करावा, असा ठराव सदस्य संग्राम जामकर व दीपाली चौधरी यांनी सभेत मांडला.

वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा

समाजकल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा मुद्दा सदस्य रितेश काळे यांनी उपस्थित केला. पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळत नसल्यास त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. ग्रामीण भागातील गरजू आणि वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, असेही त्यांनी सभेत नमूद केले. विविध विभागांशी संबंधित प्रश्नांवर सदस्यांनी सभेत आवाज उठविल्याने ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांच्या अंमलबजावणीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. आता या मागण्यांवर जिल्हा परिषद प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे लक्ष लागले आहे.

Parbhani Zilla Parishad Building
Nanded MGNREGA Scam : विहीर न खोदताच निधी उचलल्याचे अहवालात स्पष्ट

सदस्या दिपाली चौधरी यांनी जिंतूर पं.स. इमारतीच्या निकृष्ट बांधकामप्रश्नी देयके थांबविणे व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत तपासणी करणे हा ऐनवेळेचा विषय मांडला. तसेच जि.प.चे तत्कालीन अतिरिक्त सीईओ अजिंक्य पवार यांच्या विरुद्धच्या प्रलंबित १ ते ४ कार्यवाहीचा कार्यवाहीचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठविण्याचा मुद्दा उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.