

Maratha community Facebook post
जिंतूर: मराठा समाजातील महिलांबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह व अश्लील पोस्ट केल्याप्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान परभणी येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तरुणाला अटक केली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, फेसबुकवरून सोपान उकंडे याने मराठा समाजातील महिलाबाबत अश्लील व आक्षेपार्ह पोस्ट केली होती. यामुळे जिंतूर शहरातील मराठा समाजातील नागरिकांतून संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहेत. संबंधित प्रकरणामुळे शहरात व परिसरात मोठी खळबळ उडाली असून मराठा समाजातील नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
संतप्त मराठा समाजातील युवक संबंधितावर गुन्हा दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. यावेळी संतोष शिंदे यांच्या फिर्यादीवरून सोपान उकंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा परभणी येथील स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी सोपान उकंडे यास ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे.