Yeldari Dam | येलदरी धरणाचे ६ दरवाजे उघडले, पूर्णा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

Purna Rain Update | नदी पात्रात १५ हजार ३६० क्युसेक विसर्ग सुरू
Yeldari dam gates open
येलदरी धरणाच्या सहा दरवाजातून तब्बल 15 हजार 360 क्युसेक विसर्ग सुरू Pudhari
Published on: 
Updated on: 

Purna river flood alert

जिंतूर: तालुक्यातील येलदरी धरणाच्या तब्बल सहा दरवाजातून तब्बल 15 हजार 360 क्युसेक वेगाने पूर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पूर नियंत्रण कक्षाने नदीकाठी गावांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा येथून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने त्याचा थेट परिणाम येलदरी धरणातील जलाशयात होतो. सद्या येलदरी धरण परिक्षेत्रात पावसाचा जोर जरी नसला तरी उर्ध्वव भागातील खडकपूर्णा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने साहजिकच येलदरी धरणात पाण्याची आवक वाढल्याने पाणी साठ्यात वाढ झालेली आहे.

Yeldari dam gates open
Parbhani Heavy Rainfall | परभणी जिल्ह्याला धो-धो पावसाने झोडपले

रविवारी व सोमवारी प्रत्येकी अर्धा मीटरने गेट उघडून जलविद्युत केंद्रातून गेट नंबर 1,3,5,6,8 व 10 या गेट द्वारा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सहा गेट द्वारे 12 हजार 660 व वीजनिर्मिती गेट द्वारे 2 हजार 700 असा एकूण 15 हजार 360 क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. दरम्यान, यावर्षी पडलेल्या समाधानकारक पावसामुळे परभणी जिल्ह्यासह हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news