

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील चुडावा पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या रुंज येथे घरात एकटी पाहून एका महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यास तुझ्या मुलांना जिवे मारुन टाकतो, अशी धमकी पीडित महिलेस दिली. या प्रकरणी निवृत्ती पांडूरंग कदम या संशयिताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक मााहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील रुंज येथील एक महिला (वय २५) घरी एकटीच होती. यावेळी निवृत्ती कदम याने महिलेचे पाठीमागून तोंड दाबून धरले. मला कामवासना करु दे, असे म्हणत तिचा विनयभंग केला. तसेच माझ्याविरुध्द तक्रार दिली. तर तुझ्या मुलांना जिवे मारुन टाकतो, अशीही धमकी दिली. त्यानंतर महिलेने तक्रार दिली.
या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरसिंग पोमनाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार गवळी पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा