परभणी : पंढरपुरहून परतीच्या प्रवासावर असलेल्या वारकऱ्याचा बसमध्ये मृत्यू

सेनगाव बस स्थानकातील घटना
 Varkari death
पंढरपुरहून परतीच्या मार्गावर असलेल्या वारकऱ्याचा बसमध्ये मृत्यू झाला.
Published on
Updated on

सेनगाव : पंढरपूर येथून परतीच्या मार्गावर असलेल्या सेनगाव तालुक्यातील गोंडाळा येथील वारकऱ्याचा बसमध्येच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.१७) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. रामराव साहेबराव रहाटे (वय ५७) असे या वरकऱ्याचे नाव आहे.

 Varkari death
बीड : वारकरी महिलेचा पंढरपुरात हृदयविकाराने मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी, गोंडाळा येथील रहिवासी असलेले रामराव रहाटे हे मागील वीस ते पंचवीस वर्षापासून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या वारीला जातात. यंदाही ते गावकऱ्यांसोबत मागील वीस दिवसापूर्वी पंढरपूरकडे पायी निघाले होते. पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे बुधवारी (दि.१७) सकाळी त्यांच्यासोबत असलेल्या वारकऱ्यांनी त्यांना रिसोड आगाराच्या बसने सेनगावकडे बसवून दिले. त्यांच्यासोबत एक वारकरीदेखील देण्यात आला. दरम्यान, सायंकाळी सहाच्या सुमारास पंढरपूर यात्रा स्पेशल बस सेनगाव ते येलदरी मार्गावर आली असताना रामराव यांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. सेनगाव आल्यानंतर सूचना करा, अशी विनंती बस वाहकाला केली. त्यानुसार बस सेनगाव बस स्थानकात आल्यानंतर वाहकाने त्यांना आवाज दिला. मात्र, त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वाहकाने त्यांच्याजवळ जाऊन उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news