Parbhani Hunger Strike | उपकार्यकारी अभियंत्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी येलदरी प्रकल्प कार्यालयासमोर उपोषण

उपकार्यकारी अभियंता बी. ए. जामोदकर यांनी जातीवाचक शिवीगाळ करून धमकावल्याचा आरोप
Vijay Ubale hunger strike
विजय उबाळे यांनी येलदरी प्रकल्प कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे (Pudhari Photo)
Published on
Updated on

Vijay Ubale hunger strike Yeldari project

परभणी : येलदरी जलविद्युत निर्मिती प्रकल्पातील उपकार्यकारी अभियंता बी. ए. जामोदकर यांनी जातीवाचक शिवीगाळ करून धमकावले. या प्रकरणाच्या निषेधार्थ विजय उत्तमराव उबाळे (रा. आंबेडकर नगर, येलदरी कॅम्प, ता. जिंतूर, जि. परभणी) यांनी आजपासून (दि.१६) येलदरी प्रकल्प कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

उबाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जामोदकर हे गेल्या १५ वर्षांपासून येलदरी प्रकल्पावर कार्यरत असून, त्यांच्याकडून झालेल्या जातीवाचक शिवीगाळीबाबत जिंतूर पोलीस स्टेशनमध्ये अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना जामीन देखील नाकारला आहे. तरीदेखील संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबन किंवा चौकशीची कारवाई न करता त्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. याबाबत कार्यकारी अभियंता उन्मेश पाटील व अन्य जबाबदार अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप उबाळे यांनी केला.

Vijay Ubale hunger strike
Parbhani Heavy Rainfall | परभणी जिल्ह्याला धो-धो पावसाने झोडपले

या निषेधार्थ त्यांनी प्रकल्प कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग अवलंबला असून, “न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील,” असा इशारा दिला आहे. तसेच सर्व नागरिकांनी या लढ्यात सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news