परभणी: पूर्णेत चाकूचा धाक दाखवून मोटारसायकल पळवणारे जेरबंद 

परभणी: पूर्णेत चाकूचा धाक दाखवून मोटारसायकल पळवणारे जेरबंद 

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: शहरातील रेल्वे ब्रिजखाली १ मेरोजी ५ वाजता अजिजनगर, परभणी येथील मिस्त्री काम करणारे फिर्यादी मुस्तफा शाह अनवर (वय १९) यांना चाकूचा धाक दाखवून मोबाईल व  (एमएच २२ बी बी ७०९८) दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पळवली होती. या घटनेचा पूर्णा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

त्यानंतर पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या आदेशानुसार पथक स्थापन करण्यात आले होते. चोरट्यांचा कसून शोध घेतल्यानंतर  सहायक पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद क-हाळे यांच्या पथकाने  शोध घेत ७२ तासांत संशयित आरोपी वैभव जगन्नाथ नारायणकर (अण्णाभाऊ साठेनगर,  पूर्णा), प्रथमेस अनिल फड (आनंदनगर, पूर्णा) यांना सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरलेली मोटारसायकल, मोबाईल, हत्यार, गुन्हात वापरलेली मोटारसायकल असा एकूण १ लाखांचा मुद्देमाल‌  हस्तगत केला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news