Parbhani Heavy Rain | ताडकळस परिसरात मुसळधार पावसाचा कहर; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

हाताशी आलेली उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट
flood damage to crops
पिकांमध्ये साचलेले पाणी Pudhari
Published on
Updated on

Flood damage to crops in Tadkals

ताडकळस: तालुक्यातील ताडकळस व परिसरात गेल्या महिनाभरापासून सतत पावसाची हजेरी असून, गेल्या दोन दिवसांत तर मुसळधार पावसाने कहर केला आहे. गुरुवारी (दि. ११ सप्टेंबर) सकाळी तब्बल दोन तास जोरदार पाऊस झाला, तर शुक्रवारी (दि. १२ सप्टेंबर) दुपारपासून संध्याकाळपर्यंत पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली.

या सततच्या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले असून परिसरातील शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. हाताशी आलेली उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. पिकांच्या वाढीला अडथळा निर्माण होऊन पिके पिवळी पडली असून काही ठिकाणी अतिपावसामुळे जमीनही खरडली गेली आहे.

flood damage to crops
Purna Flood | पुरात जेसीबीवर अडकलेले समृद्धी महामार्गाच्या ४ मजुरांची आठ तासांनंतर सुखरूप सुटका

नगदी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचा वर्षभराचा आर्थिक आधार धोक्यात आला आहे. "पिकेच नाहीशी झाली तर संसार कसा चालवायचा?" असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. सध्या ताडकळस मंडळात अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीबाबत शासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

flood damage to crops
Purna Railway Station Childbirth| रेल्वे डब्यात प्रवासी महिलेची प्रसूती : डॉक्टर बनले देवदूत, बाळ-बाळंतीण सुखरूप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news