Parbhani News | गतिरोधकांच्या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन

अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत गतिरोधक बसविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे
Selu PWD Protest
Selu PWD Protest Pudhari
Published on
Updated on

Selu PWD Protest

सेलू : सेलू शहरातून जाणाऱ्या परतूर-मानवत रोड राज्य महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर गतिरोधक बसविण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, सेलू कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. जवळपास एक तास चाललेल्या या आंदोलनानंतर अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत गतिरोधक बसविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

परतूर-मानवत रोड हा सेलू शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग असून सातोना रोड ते परभणी रोडदरम्यान शाळा, महाविद्यालये, हॉटेल्स, दुकाने तसेच मोठी नागरी वस्ती आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते वालूर नाका या मार्गाचे सिमेंटीकरण झाल्याने वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे वारंवार अपघात होत असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर काही जण कायमचे अपंग झाले आहेत.

Selu PWD Protest
Parbhani politics : स्वीकृतसाठी पक्षांची आघाडी करा, नाहीतर संधी गमवा

या समस्येबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक वेळा निवेदने देऊन तसेच तोंडी सूचना करूनही गतिरोधक बसविण्यात आले नसल्याने नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला. आंदोलनादरम्यान अभियंता माने यांनी येत्या आठ दिवसांत संबंधित मार्गांवर गतिरोधक उभारण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिले.

या आंदोलनात जयसिंग शेळके, शिवशंकर मोरे, संतोष निर्वळ, गोविंद हरणे, भरत शेरे, पवन नाईक, समाधान निर्वळ, नितीन होगे, वैभव शेरे, राजू नाईक, मुंजा गाडेकर, गणेश शेवाळे, अक्षय जोशी, विराट तिर्थे, माऊली लेवडे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news