

Selu Court Verdict Cheque Bounce Case
सेलू, : धनादेश अनादर प्रकरणात सेलू येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गौरव तराळ यांनी आरोपी कैलास रामधन चव्हाण याला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच फिर्यादीला धनादेशाच्या दुप्पट म्हणजेच तीन लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून एका महिन्याच्या आत देण्याचे आदेश २१ ऑक्टोबर २०२६ रोजी दिले.
या प्रकरणातील फिर्यादी संजय जेमा राठोड (रा. पाडी लंगे, ता. सेलू, जि. परभणी) यांच्याकडून धनराज कन्स्ट्रक्शनचे मालक कैलास रामधन चव्हाण यांनी बांधकाम साहित्य पुरवठ्यापोटी एक लाख ५० हजार रुपयांचा माल घेतला होता. या व्यवहाराच्या मोबदल्यात चव्हाण यांनी राठोड यांना धनादेश दिला होता.
खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने धनादेश अनादरित संजय राठोड यांनी संबंधित धनादेश बँकेत जमा केला असता, खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे तो अनादरित झाला. त्यामुळे राठोड यांनी कैलास चव्हाण यांच्याविरुद्ध परक्राम्य लेख अधिनियमाच्या (Negotiable Instruments Act) कलम १३८ अंतर्गत सेलू येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात खटला दाखल केला होता.
या खटल्यात फिर्यादीने सादर केलेले पुरावे आणि त्यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. फिर्यादीला तीन लाख रुपये नुकसानभरपाई एका महिन्याच्या आत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ही रक्कम निर्धारित मुदतीत न दिल्यास आरोपीला आणखी तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल, असेही न्यायालयाच्या आदेशात नमूद आहे. या प्रकरणात फिर्यादी संजय जेमा राठोड यांच्या वतीने अॅड. एल. एच. खोना यांनी काम पाहिले.