Parbhani News | बरबडी शिवारात स्फोटक साठा; पांगरा येथील शेतकऱ्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप
Purna Dangerous Explosives Stock
Purna Dangerous Explosives Stock Pudhari
Published on: 
Updated on: 

Parbhani Purna Dangerous Explosives Stock

पूर्णा : पूर्णा तालुक्यातील बरबडी शिवारातील गट क्रमांक ७६ मध्ये ठेवण्यात आलेला जिलेटिन कांड्या आणि डेटोनेटरचा साठा जीवितास धोकादायक असल्याची तक्रार करण्यात आली आहे. हा स्फोटक साठा तातडीने हटवून परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांना संभाव्य धोक्यापासून मुक्त करावे, अशी मागणी पांगरा येथील शेतकरी गोविंद भाऊराव ढोणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करूनही दखल घेतली नसल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

पूर्णा तालुक्यातील बरबडी शिवारात गट क्रमांक ७६ मध्ये विहिरी आणि खदानींमधील कठीण दगड फोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्फोटकांचा साठा करण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. राजस्थानमधील एका व्यापाऱ्याने हा साठा ठेवल्याचे निवेदनात नमूद आहे. विहिरींमधील दगड फोडण्यासाठी काम करणाऱ्या व्यावसायिकांना जिलेटिन कांड्या आणि डेटोनेटरची विक्री केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Purna Dangerous Explosives Stock
Parbhani Agriculture News : घटातील धान्‍याने रब्‍बी हंगामात पिकांच्‍या आशा पल्‍लवित

स्फोटकांची वाहतूक आणि साठवणुकीवर आक्षेप

जिलेटिन कांड्या आणि डेटोनेटर यांची एकत्रित साठवणूक तसेच वाहतूक केली जात असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. अशा प्रकारामुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. संबंधित व्यवसायात स्फोटकांच्या साठवणुकीसाठी आणि वाहतुकीसाठी निर्धारित नियमांचे पालन होत नसल्याचा दावाही निवेदनातून करण्यात आला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पडताळणी झाल्याची माहिती उपलब्ध नाही.

शेतकरी कुटुंबांसह जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न

गोविंद ढोणे यांच्या शेताला लागूनच गट क्रमांक ७६ असल्याचे निवेदनात म्हटले आहे. स्फोटक साठ्यामुळे आपल्या कुटुंबीयांसह शेतातील दुभत्या जनावरांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने विलंब न करता संबंधित ठिकाणाची पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Purna Dangerous Explosives Stock
Parbhani News : दसऱ्याच्या दिवशी झेंडू फुलांना कवडीमोल दर; शेतकरी हवालदिल

चौकशी पूर्ण होईपर्यंत स्फोटकांचा साठा आणि त्यांची वाहतूक तातडीने बंद करावी, तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या निवेदनावर गोविंद ढोणे यांच्यासह पिराजी सोलव, शिवचरण जाधव, कैलाश शिंदे, गजानन शिंदे, नितीन जाधव, निवृत्ती ढोणे, कैलास ढोणे आणि माणिक ढोणे यांच्या सह्या आहेत. प्रशासनाकडून या तक्रारीवर कोणती कारवाई केली जाते, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news