Rohit Pawar: जिंतूर येथे नुकसानग्रस्त पिकांची रोहित पवारांनी केली पाहणी

Rohit Pawar: जिंतूर येथे नुकसानग्रस्त पिकांची रोहित पवारांनी केली पाहणी

जिंतूर: पुढारी वृत्तसेवा: परभणी जिल्ह्यासह जिंतूर-सेलु तालुक्यात रविवारी (दि.२६) मध्यरात्री अवकाळी पाऊस झाला. यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जोराचा वारा आणि पावसामुळे शेतातील तुरीचे पीक सपशेल जमिनीवर आडवे झाले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची कापसाची ५० टक्के वेचणी बाकी असतानाच हा अवकाळी पाऊस आल्याने कापूस संपूर्ण मातीत मिसळला आहे. त्याचबरोबर ज्वारी, गहू, हरभरा आदी रब्बी पिके जमीनदोस्त झाली आहेत. त्याचबरोबर फळबागाही उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. Rohit Pawar

दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार युवा संघर्ष यात्रेनिमित्त जिंतूर येथून जात होते. यावेळी त्यांनी मौजे शेवडी येथील शेतात जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. त्याचवेळी आमदार विजय भांबळे यांनी जिंतूरचे तहसीलदार सरोदे यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पिकांचे तत्काळ पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याच्या सुचना केल्या. Rohit Pawar

याप्रसंगी मनोज थिटे, बाळासाहेब घुगे, बाळासाहेब भांबळे, रामराव उबाळे, सुधाकर सानप, जगन काळे, दिगंबर घुगे, विजय खिस्ते, यांच्यासह अनेक शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news