Parbhani accident | वाळूच्या उभ्या हायवाला मोटारसायकलची धडक; महावितरण कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू

डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्त्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला
  Accident News
Accident Newspudhari photo
Published on
Updated on

मानवत : रस्त्यावर धोकादायकरित्या उभ्या असलेल्या हायवाला पाठीमागून मोटारसायकल धडकून भीषण अपघात झाला. यामध्ये तालुक्यातील रामेटाकळी येथील महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. केकरजवळा ते पाथरी रोडवरील चारीजवळ शुक्रवारी (२६ जून) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

  Accident News
Jalna accident | जाफ्राबाद-चिखली रोडवर भीषण अपघात; कारला आग लागून तरुणाचा होरपळून मृत्यू

विष्णू पांडुरंग गयाळ (३९, रा. नाव्हा, ता. पालम, ह. मु. पाथरी) असे अपघातात मृत झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते मानवत तालुक्यातील रामेटाकळी येथील वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनवरून आपली ड्युटी संपवून दुचाकीने (क्र. एमएच २२ ए यू ९४०८) पाथरी येथील घराकडे निघाले होते. दरम्यान, केकरजवळा-पाथरी रोडवरील चारीजवळ वाळूने भरलेला हायवा ट्रक (क्र. एम एच २१ एक्स ६२१३) नादुरुस्त झाल्यामुळे रस्त्यावरच उभा होता. रात्रीच्या वेळी अंधार असल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या या हायवाचा अंदाज दुचाकी चालक गयाळ यांना आला नाही. त्यामुळे त्यांची दुचाकी थेट हायवावर जाऊन पाठीमागून जोरात धडकली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्त्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला.

  Accident News
Jalgaon Accident : साखरपुड्यासाठी येणाऱ्या गुजरातमधील लोकांवर काळाचा घाला, ५ जणांचा मृत्‍यू

अपघात घडताच आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली, नागरिकांनी त्वरित रुग्णवाहिकेला फोन करून पाचारण केले. घायाळ यांना तात्काळ पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news