Parbhani news | वादळीवाऱ्यात सोलार संच कोसळल्याने बागायती पिकावर गंडांतर

सोलारची दुरुस्ती अथवा नवीन सोलार प्लेट उपलब्ध नसल्यामुळे संबंधित कृषी पंप बंद आहेत
Parbhani news | वादळीवाऱ्यात सोलार संच कोसळल्याने बागायती पिकावर गंडांतर
Published on
Updated on

पूर्णा : तालुक्यातील एरंडेश्वर, कात्नेश्वर, आहेरवाडी शेतशिवारात (दि.६) सायंकाळी ४ वाजेनंतर जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला होता. या नैसर्गिक आपत्तीत केळी बागा मोडून पडल्या. काही शेतकऱ्यांनच्या बोअरवेलवरील कृषीपंप सोलार संच मोडून वाकून मोठे नुकसान झाले.

सोलार संचाच्या ऊन्हाचे किरण शोषून विजनिर्मिती करणाऱ्या सौलार प्लेट बाधीत झाल्यामुळे कृषीपंप बंद झाले आहेत. त्यामुळे या सोलार कृषी पंपावर सिंचन केला जाणारा उभे ऊस पिकं पंप बंद असल्याने सुकून वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत. सोलारची दुरुस्ती अथवा नवीन सोलार प्लेट उपलब्ध नसल्यामुळे संबंधित कृषी पंप बंद आहेत.

Parbhani news | वादळीवाऱ्यात सोलार संच कोसळल्याने बागायती पिकावर गंडांतर
Purna Stromy Rain | एरंडेश्वर शेतशिवारात वादळीवाऱ्यासह अवकाळीचा हाहाकार; २५ एकर केळीबाग भुईसपाट

सध्या उन्हाचा पारा ४२ अंश सेल्सिअसवर असताना व त्यातच कृषी पंप बंद असल्याने ऊस व ईतर बागायती पिकांचे पाणी बंद झाले आहे. सदरील वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस पडून सौलार पडून वाकून डॅमेज झालेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे पहावयास मिळत आहे.

Parbhani news | वादळीवाऱ्यात सोलार संच कोसळल्याने बागायती पिकावर गंडांतर
Renapur cattle market | बैल बाजार : दीड वर्षात अवघ्या दोन-अडीचशेच बैलांची विक्री

आहेरवाडी गाव पांढरी तर्फे नावाची गट क्रमांक ५३ मधील बोअरवेल वर ५ एच पी चा सौलार संच हा कृषी पंपासाठी बसविण्यात आला होता.ता ६ जून रोजी जोराचा वादळी वारा सुटून अवकाळी पाऊस पडला.त्यात सौलार संच वाकून जमिनीवर आदळून सौलार प्लेट बाद झाली . त्यामुळे कृषी पंप बंद असल्यामुळे अडिच एकर ऊस पीक सुकून वाळून जाण्याच्या मार्गावर लागला आहे.त्याची पाहणी पंचनामा करुन शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणं आवश्यक आहे.

लक्ष्मणराव माणिकराव मोरे शेतकरी, आहेरवाडी ता पूर्णा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news