Parbhani Railway News | रेल्वेच्या भरारी पथकाने फुकट्या प्रवाशांकडून वसूल केला १ कोटी ३६ लाखांचा दंड
Ticketless Passengers Fine Parbhani Train Checks
पूर्णा: दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड डिव्हीजनमधील रेल्वेच्या तिकीट निरीक्षक भरारी पथकाने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून सुमारे १ कोटी ३६ लाखांचा दंड वसूल केला. ९ तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या. यात २३ हजार ४८० प्रवाशी विना तिकीट प्रवास करताना आढळून आले होते.
विना प्रवास करणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी विभागीय व्यवस्थापक प्रदीप कामले यांच्या मार्गदर्शनात ९ तपासणी मोहीमा राबविण्यात आल्या होत्या. एप्रिल, मे दोन महिन्यांत ही कारवाई करण्यात आली. वाणिज्य व्यवस्थापक श्रीनिवास सुर्यवंशी, डॉ. विजय कृष्णा, सुब्बाराव एन यांच्या मार्गदर्शनाखाली तिकीट तपासणी मोहिम यशस्वी करण्यात आली.
तिकीट निरीक्षकांची पथके बनवून रेल्वे स्टेशन व रेल्वे डब्यात प्रवाशांच्या तिकीटांची तपासणी करण्यात आली. त्यात तब्बल २३ हजार ४८० प्रवाशी विना तिकीट प्रवास करताना आढळून आले. तिकीट काढून प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास करावा, असे आवाहन डीआरएम प्रदिप कामले यांनी केले आहे.

