

Purna Lawyers Office Fire
पूर्णा: शहरात सोमवारी (दि.८) सकाळी साडेदहाच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या गेटसमोरील दोन कार्यालयांना अचानक आग लागली. या घटनेत विधीज्ञ राजेश भालेराव आणि विधीज्ञ पळसकर यांचे कार्यालय पूर्णतः जळून खाक झाले.
कार्यालयातील संगणक संच, झेरॉक्स मशीन, ऑनलाईन सेवा साहित्य, टेबल, खुर्च्या, फर्निचर, लॅपटॉप यांसह इतर महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाने तत्काळ पाचारण होऊन बंबच्या साहाय्याने आग नियंत्रणात आणली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र जळालेल्या साहित्यामुळे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगीमुळे दोन्ही कार्यालयांचे नियमित कामकाज तात्पुरते विस्कळीत झाले आहे.