Parbhani Accident | पूर्णा - ताडकळस मार्गावर दुचाकी -ट्रॅक्टरची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

बळीराजा साखर कारखान्यासमोरील घटना
Purna Tadkalas Road Accident
ज्ञानेश्वर बोकारेPudhari
Published on
Updated on

Purna Tadkalas Road Accident

पूर्णा : पूर्णा तालुक्यातील पूर्णा–ताडकळस मार्गावर कानडखेड शिवारात बळीराजा साखर कारखान्यासमोर गुरूवारी (दि. २५) दुपारी सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास दुचाकी व ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला.

मृत युवकाचे नाव ज्ञानेश्वर सटवाजी बोकारे (वय ३९, रा. फुकटगाव, ता. पूर्णा) असे आहे. ज्ञानेश्वर बोकारे हे दुचाकीवरून आपल्या गावाकडे जात असताना साखर कारखान्यासमोर ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Purna Tadkalas Road Accident
Nagar Parishad Election Result 2025 | पूर्णा पालिकेच्या निकालाने राजकीय समीकरणे बदलली

घटनेची माहिती मिळताच पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला.

मृत ज्ञानेश्वर बोकारे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, आई, दोन भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे फुकटगाव परिसरात शोककळा पसरली आहे. ते शेतीसह तहसील कार्यालयातील कामे करून उदरनिर्वाह करत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news