Purna Gram Sabha Chaos | सोनखेड ग्रामसभेत गोंधळ; महिला सरपंचाला जीवे मारण्याची धमकी

चुडावा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; ग्रामसभा उधळल्याने गावात खळबळ
Purna Sonkhed Gram Sabha Chaos
पूर्णा तालुक्यातील सोनखेड (मोठी पांढरी) येथे ग्रामसभेदरम्यान गोंधळ घालून महिला सरपंचाला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी Pudhari
Published on
Updated on

Purna Sonkhed Gram Sabha Chaos

पूर्णा : पूर्णा तालुक्यातील सोनखेड (मोठी पांढरी) येथे ग्रामसभेदरम्यान गोंधळ घालून महिला सरपंचाला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी सोनखेड येथील दोन जणांविरुद्ध चुडावा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून, काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सोनखेड (मोठी पांढरी) ग्रामपंचायतीची ग्रामसभा २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोरील सार्वजनिक जागेत आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभा सुरू असताना गावातील गणपत गोविंद सूर्यवंशी आणि धनाजी गोविंद सूर्यवंशी यांनी संगनमत करून सभेत गोंधळ घातल्याची तक्रार आहे.

Purna Sonkhed Gram Sabha Chaos
Purna Encroachment | पूर्णा-चुडावा-ताडकळस मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांवर बुलडोझर

तक्रारीनुसार, संबंधित दोघांनी ग्रामसभेच्या कामकाजात अडथळा निर्माण करून सभा बरखास्त होईल, अशी परिस्थिती निर्माण केली. त्यानंतर ग्रामसभेच्या अध्यक्ष महिला सरपंच मुक्ताबाई सोपानराव सूर्यवंशी यांच्या अंगावर धावून जात त्यांना अश्लील शिवीगाळ केली. तसेच त्यांना सार्वजनिक कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करून सरपंच आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

चुडावा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

महिला सरपंच मुक्ताबाई सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून चुडावा पोलिस ठाण्यात संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल कच्छवे करीत आहेत.

Purna Sonkhed Gram Sabha Chaos
Purna Water Crisis | पूर्णा येथे बोअरवेल असूनही पाणीटंचाई; भर पावसाळ्यात पाण्याच्या शोधात महिलांची भटकंती

ग्रामसभा उधळल्याने गावात खळबळ

ग्रामसभेत गोंधळ घालून महिला सरपंचाला शिवीगाळ आणि धमकी देण्यात आल्याच्या घटनेमुळे गावात चर्चेला उधाण आले आहे. ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

महिला सरपंच विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून गावात विकासकामे राबवत असताना त्यांना दडपशाहीच्या माध्यमातून त्रास दिला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. यापूर्वीही विकासकामांवरून महिला सरपंचांना त्रास दिल्याचे प्रकार घडल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news