Purna Accident | पूर्णा येथे टिप्परच्या धडकेत दुचाकीवरील तरुण ठार; वडील गंभीर जखमी

पूर्णा शहरातील ताडकळस फाटा टी-पॉईंट येथे भरधाव टिप्परची दुचाकीला जोरदार धडक
Purna Tipper Bike Collision
Purna Tipper Bike CollisionPudhari
Published on
Updated on

Purna Tipper Bike Collision

पूर्णा: पूर्णा शहरातील ताडकळस फाटा टी-पॉईंट येथे भरधाव टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ३२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना मंगळवारी (दि. २६) दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

मृत युवकाचे नाव शेख सिद्दीक उर्फ शादूल जिलानी (वय ३२, रा. सातेफळ वाघ, ता. पूर्णा, जि. परभणी) असे आहे. तर त्यांचे वडील शेख जिलानी शेख वजीर (वय ५५) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Purna Tipper Bike Collision
Parbhani Fuel Crisis | पूर्णा तालुक्यात डिझेल टंचाईमुळे ट्रॅक्टर चालक-मालक हैराण

मिळालेल्या माहितीनुसार, दोघे पितापुत्र दुचाकीवरून सातेफळ वाघ येथून पूर्णा शहराकडे येत होते. ताडकळस फाट्यावर आल्यानंतर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात शेख सिद्दीक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मागे बसलेले त्यांचे वडीलही गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, फौजदार श्रीनिवास पडलवार तसेच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले.

Purna Tipper Bike Collision
Parbhani diesel shortage news| डिझेलसाठी पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा

या दुर्घटनेमुळे सातेफळ वाघ गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अविवाहित युवकाच्या अकाली निधनाने शोककळा पसरली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news