Purna Panchayat Samiti | पूर्णा पं.स. सत्ता स्थापनेपूर्वी नाट्यमय घडामोडी: बहुमतातील सदस्यांत फूट?; अपक्ष सभापतीची चर्चा

Parbhani Politics | उबाठा शिवसेना व अपक्ष सदस्यांशी हातमिळवणीसाठी हालचाली
Purna Panchayat Samiti
Purna Panchayat SamitiPudhari
Published on
Updated on

Purna Panchayat Samiti chairman Election

पूर्णा : पूर्णा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड १० मार्च रोजी दुपारी ३ वाजता पंचायत समितीच्या सभागृहात होणार आहे. या निवडीसाठी एकूण १२ सदस्यांपैकी किमान ७ सदस्यांचे बहुमत आवश्यक आहे. मात्र निवडणुकीनंतरच्या राजकीय घडामोडींमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून सत्ता स्थापनेसाठी नाट्यमय हालचाली सुरू झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर भाजपचे ४, उबाठा शिवसेनेचे ३, यशवंत सेनेचे २, अपक्ष २ आणि राष्ट्रवादीचा १ असा पक्षीय आकडा होता. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली यशवंत सेनेचे २ आणि राष्ट्रवादीचा १ असे तीन सदस्य गंगाखेड येथे भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे भाजपची सदस्यसंख्या ७ वर पोहोचून बहुमत मिळाले आणि सभापती-उपसभापती पदावर भाजपची निवड निश्चित मानली जात होती.

Purna Panchayat Samiti
Parbhani Zilla Parishad : झेडपीच्या सत्तेसाठी महापेच, अध्यक्षासह उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात

मात्र, गेल्या पाच दिवसांपासून राजकीय समीकरणात अचानक बदल झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बहुमतासाठी तयार ठेवलेल्या ७ सदस्यांपैकी काही सदस्यांत फूट पडल्याचे सांगितले जात असून त्यांनी उबाठा शिवसेना व अपक्ष सदस्यांशी हातमिळवणी केल्याचेही बोलले जात आहे. काही सदस्य सहलीवर गेल्याच्या चर्चेमुळे या घडामोडींना अधिक रंग चढला आहे.

या बदलांमुळे विरोधी गटाकडे ७ ते ८ सदस्यांचे संभाव्य बहुमत तयार झाल्याची माहिती राजकीय वर्तुळातून पुढे येत आहे. त्यामुळे नव्या समीकरणानुसार अपक्ष सदस्याला सभापती तर उबाठा शिवसेनेच्या सदस्याला उपसभापती पद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Purna Panchayat Samiti
Purna Politics | पूर्णा तालुक्यात राजकीय भूकंप : यशवंत सेनेच्या २, राष्ट्रवादीच्या पं.स. सदस्याचा भाजपमध्ये प्रवेश

दरम्यान, १० मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीत हे नवे राजकीय समीकरण यशस्वी ठरणार का, की ऐनवेळी पुन्हा बदल होऊन पूर्वीच्या बहुमतावर सत्ता स्थापन होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी गट या घडामोडींना कसे प्रत्युत्तर देतो आणि कोणता गट अखेर सत्ता स्थापतो, हे मंगळवारी दुपारी ३ नंतर स्पष्ट होणार आहे.

सभापती-उपसभापती निवडीसाठी आता अवघे दोन दिवस उरले असून पूर्णा तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेचे लक्ष या राजकीय घडामोडीकडे लागले आहे. बहुमत मिळाल्यानंतरही अचानक बदल कसा झाला, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात असून सत्ता स्थापनेसाठी नवे राजकीय डावपेच रचले जात असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news