Ratnakar Gutte | पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास बँकेला टाळे ठोकू : रत्नाकर गुट्टे

पूर्णेतील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत आमदारांची धडक; जाचक कागदपत्रे आणि कर्जप्रकरणांतील विलंबाबाबत व्यवस्थापकाला जाब
Purna Loan Processing Delay
आमदार रत्नाकर गुट्टे यांनी पूर्णा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या व्यवस्थापनाला धारेवर धरले.Pudhari
Published on: 
Updated on: 

Purna Loan Processing Delay

पूर्णा : पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास बँकेला टाळे ठोकू, असा सज्जड इशारा आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी पूर्णा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या व्यवस्थापनाला दिला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेनंतर नवीन पीककर्ज मिळविण्यासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना अनावश्यक कागदपत्रांची मागणी, सिबिल स्कोअर आणि कर्जप्रकरणे प्रलंबित ठेवण्याच्या कारणांमुळे त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी बँकेला भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत शाखा व्यवस्थापकाला धारेवर धरले.

पूर्णा तालुक्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. शेतीच्या मशागतीसह बियाणे, खते आणि इतर आवश्यक खर्चांसाठी शेतकऱ्यांना वेळेत पैशांची गरज आहे. अशा परिस्थितीत पीककर्ज मिळविण्यासाठी बँकेच्या वारंवार चकरा माराव्या लागत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी आमदार गुट्टे यांच्याकडे मांडल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत त्यांनी बँकेत प्रत्यक्ष जाऊन कर्जवाटप प्रक्रियेची माहिती घेतली.

Purna Loan Processing Delay
Parbhani Drought : शेतकर्‍यांच्‍या व्‍यथा ऐकण्यासाठी आयुक्‍त थेट बांधावर

कर्जप्रकरणांसाठी वारंवार अतिरिक्त कागदपत्रे मागविणे, सिबिल स्कोअरचे कारण देणे आणि मंजुरी प्रक्रियेत विलंब करणे, अशा तक्रारींबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांची कर्जासाठी फरफट होत असेल, तर ते सहन केले जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

‘शेतकरी माझे मायबाप; त्यांची अडवणूक सहन करणार नाही’

शेतकरी आणि सर्वसामान्य जनता हेच आपले मायबाप असल्याचे सांगत आमदार गुट्टे यांनी पात्र शेतकऱ्यांची कर्जप्रकरणे नियमानुसार तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना बँक अधिकाऱ्यांना दिल्या. पीककर्जासाठी शेतकऱ्यांना वारंवार बँकेत बोलावणे, अनावश्यक कागदपत्रांची मागणी करणे आणि विनाकारण विलंब लावणे थांबवावे, असे त्यांनी बजावले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत सूचना दिल्या जात असताना बँकांमध्ये कर्जप्रकरणे वेळेत मार्गी लागत नसल्याच्या तक्रारी गंभीर असल्याचेही त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांची कामे प्राधान्याने झाली पाहिजेत आणि त्यांना बँकिंग प्रक्रियेतून दिलासा मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Purna Loan Processing Delay
Parbhani Bus Accident | परभणी - सेलू मार्गावर शिवशाही बस पलटी; पाच प्रवासी जखमी

खासगी एजंटांकडून पिळवणूक झाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

बँकेतून कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली कोणताही खासगी एजंट शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित शेतकऱ्यांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही आमदार गुट्टे यांनी केले. शेतकऱ्यांची अडवणूक आणि पिळवणूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

आमदारांच्या या भेटीमुळे पूर्णा तालुक्यातील पीककर्ज वाटपाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बँक प्रशासन शेतकऱ्यांच्या तक्रारींची कितपत दखल घेते आणि प्रलंबित कर्जप्रकरणे किती लवकर मार्गी लावते, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Purna Loan Processing Delay
Parbhani Crime | मानवत येथे आरतीवेळी गाण्याचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने चौघांवर चाकू, लोखंडी रॉडने हल्ला

या वेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नंदकुमार डाखोरे, बापूराव घाटोळ, तालुकाध्यक्ष सुभाषराव देसाई, तालुका प्रभारी नितीन ऊर्फ बंटी कदम, सरपंच सैनाजी माटे, सरपंच उत्तमराव ढोणे पाटील, दाजीबा भोसले, नगरसेवक शेख मुजीब, राजेश भालेराव, शहराध्यक्ष ईश्वर ठाकूर, किशोर सूर्यवंशी, पंचायत समिती सदस्य रमेश सूर्यवंशी, दिनानाथ दुधाटे, नरेश जोगदंड, प्रभाकर डाखोरे, साहेबराव भाकरे, विलास गिरी, सुदर्शन ढोणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news