Maratha Kunbi Certificate |पूर्णा तालुक्यात मराठा-कुणबी प्रमाणपत्र देताना महसूल अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी; सकल मराठा समाज संतप्त

Parbhani News | पूर्णा येथील तहसील कार्यालय तसेच गंगाखेड उपविभागीय कार्यालयातील वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांकडून मराठा-कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांची जाणीवपूर्वक हेटाळणी
Purna Taluka Revenue Dept
Purna Taluka Revenue DeptPudhari
Published on
Updated on

Purna Taluka Maratha Kunbi Certificate

पूर्णा : पूर्णा येथील तहसील कार्यालय तसेच गंगाखेड उपविभागीय कार्यालयातील वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांकडून मराठा-कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांची जाणीवपूर्वक हेटाळणी केली जात असल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सादर करूनही विविध कारणे पुढे करत अर्जांवर त्रुटी नोंदवल्या जात असल्याने समाजातील समन्वयक कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी अनेकदा आंदोलन केले होते. त्यानंतर राज्य शासनाने २ सप्टेंबर २०२५ रोजी हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत शासन निर्णय जारी केला.

Purna Taluka Revenue Dept
Parbhani crime : परभणीत ऑटो चालकाचा धारदार शस्त्राने खून

या पार्श्वभूमीवर पूर्णा तालुक्यातील काही नागरिकांनी १९३३-३४ च्या महसूल नोंदींनुसार त्यांच्या नातेवाईकांना मिळालेल्या कुणबी प्रमाणपत्रांच्या प्रती तसेच कुळ नातेसंबंध दर्शविणारी शपथपत्रे जोडून अर्ज दाखल केले आहेत. मात्र, हे अर्ज तहसीलदारांकडून शिफारस करून गंगाखेड येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात विलंब होत असल्याची तक्रार आहे.

उपविभागीय अधिकाऱ्यांनी याबाबत पूर्णा तहसीलदारांना खुलासा मागवून, निर्धारित वेळेत उत्तर न दिल्यास कारवाईचा इशाराही दिला होता. त्यानंतर संबंधित फाईली उपविभागीय कार्यालयात सादर करण्यात आल्या. मात्र, आता उपविभागीय अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून मराठा समाजाविषयी द्वेषभावनेतून वागत असल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या समन्वयकांकडून करण्यात येत आहे.

Purna Taluka Revenue Dept
Parbhani Accident : सोनपेठमध्ये टँकरच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

पाथरी तहसील कार्यालयाकडून सादर झालेल्या मराठा-कुणबी प्रकरणांना मंजुरी देऊन प्रमाणपत्रे वितरित केली जात असताना, पूर्णा येथील अर्जांवर कोणतीही स्पष्ट त्रुटी नसतानाही विलंब का केला जात आहे, असा सवाल समाजाच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून न्याय द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

पूर्णा तहसील कार्यालयातून पाठविलेल्या फाईली मुद्दाम टार्गेट करून नामंजूर केल्या जात आहेत. कोणतीही ठोस कारणे नसताना निरर्थक आक्षेप घेत अर्जदारांची हेटाळणी होत असल्याने संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी.

- ज्ञानोबा कदम, सकल मराठा समन्वयक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news