Illegal Sand Mining | सातेफळ नदीपात्रातील अवैध रेती उपसासाठीचे तराफे जाळले; ४० ब्रास वाळूचा साठा जप्त

Purna Tehsil | पूर्णा तालुक्यात अवैध वाळू उपसाविरोधात महसूल विभागाची कारवाई
Purna Illegal Sand Mining
Purna Illegal Sand MiningPudhari
Published on
Updated on

Purna Illegal Sand Mining

पूर्णा : पूर्णा तालुक्यात अवैध वाळू उपसाच्या विरोधात महसूल विभागाने कारवाई करत सातेफळ (वाघ) परिसरातील नदीपात्रात बसवलेले तराफे जाळून नष्ट केले. मात्र, दुसरीकडे नियमबाह्य वाळू उपसा सुरूच असल्याने प्रशासनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

२४ मार्च रोजी दुपारी महसूल पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सातेफळ शिवारातील नदीपात्रात काही अज्ञातांनी अवैध रेती उपसासाठी थर्मलचे तराफे उभारले होते. तहसीलदार बोथीकर, मंडळ अधिकारी सेलगावकर, तलाठी राठोड, चरपिवार तसेच कोतवाल श्रीधर गडगिळे यांच्या पथकाने घटनास्थळी धडक देत जेसीबीच्या सहाय्याने हे तराफे बाहेर काढले आणि जाळून टाकले. यापूर्वीही याच ठिकाणी सुमारे ४० ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला होता.

Purna Illegal Sand Mining
Parbhani News | संजय गांधी निराधार योजनेच्या अशासकीय समितीच्या नियुक्त्यांना स्थगिती

तथापि, महसूल विभाग अधूनमधून अशा कारवाया करून कडक भूमिका घेत असल्याचे दाखवत असला तरी तालुक्यातील इतर नदीपात्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. ज्या ठिकाणी वाळू घाटांचा लिलाव झालेला नाही, त्या भागांतही जेसीबी व बोटींच्या सहाय्याने रेती काढून तिची वाहतूक व विक्री सुरू असल्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, लिलाव झालेल्या वाळू घाटांमधूनही नियमांचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कंठेश्वर, सातेगाव आणि टाकळी येथील गोदावरी नदीपात्रातील घाटांचा ठेका नांदेड येथील एका कंत्राटदाराकडे असून, तेथे जेसीबी व बोटींच्या सहाय्याने नियमबाह्य पद्धतीने दिवस-रात्र वाळू उपसा होत असल्याची तक्रार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Purna Illegal Sand Mining
Parbhani News : नवीन यंत्राद्वारे होणार सेप्टिक टँकसह मलजल वाहिन्यांची स्वच्छता

या संदर्भात राजकुमार सूर्यवंशी, चंद्रमणी लोखंडे, मनोज भुजबळ, सूर्यकांत रायबोले, नामदेव कणकटे आणि नितीन दवणे यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देत संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे. अन्यथा २८ मार्च रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या सर्व घडामोडींमुळे पूर्णा तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news