Purna Hunger Strike | पूर्णा-हिवरा रस्ता कामासाठीचे उपोषण लेखी आश्वासनानंतर तिसऱ्या दिवशी स्थगित

तहसीलदार प्रशांत थारकर यांच्या मध्यस्थीने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अभियंता संजय बंडे, दीपक कुलकर्णी तसेच एमएसआरडीसी व मोंटेकार्लो कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा
Purna Hunger Strike |
ग्रामस्थांच्या उपस्थितीत तिसऱ्या दिवशी उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले.Pudhari
Published on
Updated on

Purna Hivra Road Work

पूर्णा : पूर्णा तालुक्यातील पूर्णा–पांगरा मार्गे हिवरा या सुमारे १२ किलोमीटर अंतराच्या रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाचे रखडलेले काम तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी सरपंच मंगेश साबळे आणि युवामंचाचे प्रदेशाध्यक्ष बाबाराव ढोणे यांनी २५ फेब्रुवारीपासून तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले होते.

तहसीलदार प्रशांत थारकर यांच्या मध्यस्थीने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अभियंता संजय बंडे, दीपक कुलकर्णी तसेच एमएसआरडीसी व मोंटेकार्लो कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. त्यानंतर ४ मार्च रोजी तहसील कार्यालयात बैठक घेऊन रस्ता कामाबाबत तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानंतर शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी पाच वाजता ग्रामस्थांच्या उपस्थितीत तिसऱ्या दिवशी उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले.

Purna Hunger Strike |
Purna Hunger Strike | पूर्णा-हिवरा रस्ता कामासाठी बाबाराव ढोणे यांचे आमरण उपोषण; कंत्राटदार आणि प्रशासनाविरोधात संताप

दरम्यान, पूर्णा ते हिवरा या रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत लातूर येथील मे. आशिर्वाद कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आले होते. सुरुवातीला रस्ता मजबुतीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. मातीमिश्रित मुरूम व अल्प प्रमाणात गिट्टी वापरून काम करण्यात आले आणि नंतर ते अर्धवट सोडून यंत्रसामग्री अन्यत्र हलविण्यात आली, असा आरोप आहे.

यानंतर समृद्धी महामार्गासाठी मेटल वाहतुकीसाठी मोंटेकार्लो कंपनीच्या हायवा टिप्परची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू झाली. त्यामुळे रस्ता उखडून गिट्टीमय झाला असून दुचाकीस्वार घसरून जखमी होण्याच्या घटना घडल्या. विद्यार्थ्यांसह शेतकरी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Purna Hunger Strike |
Purna Farmer | कंठेश्वर शिवारात महावितरणचा निष्काळजीपणा नडला! शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक

समृद्धी महामार्गाच्या कामासाठी सुरू असलेली मेटल वाहतूक थांबवता येणार नाही, असे एमएसआरडीसी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी, ज्या भागातून मेटल वाहतूक होते तो भाग वगळता उर्वरित रस्ता काम सुरू करण्याची तयारी दर्शविली. मात्र, नेमका कोणत्या टप्प्यापर्यंत काम करायचे याबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर ४ मार्च रोजी सर्व संबंधित अधिकारी, उपोषणकर्ते व स्थानिक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन मार्ग निश्चित करण्यात येणार आहे. त्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास सात गावांचे सरपंच, नागरिक, शेतकरी व विद्यार्थी पुन्हा रस्ता रोको आंदोलन छेडतील, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news