Purna Petrol Shortage | पूर्णा येथे इंधन टंचाई: पाचही पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; वाहनधारक त्रस्त

वेळेवर इंधन न मिळाल्याने वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे
Parbhani petrol diesel scarcity
वेळेत पेट्रोल आणि डिझेल न मिळाल्याने अनेकांना वाहनांसह थांबून राहावे लागत आहेPudhari
Published on
Updated on

Parbhani petrol diesel scarcity

पूर्णा : शहरासह परिसरातील सर्व पाच पेट्रोल पंपांवर गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे वेळेवर इंधन न मिळाल्याने वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

टि-पॉईंट चौकाजवळील एस्सार, झिरो रोडवरील भारत पेट्रोलियम, ताडकळस मार्गावरील एचपी, इंडियन ऑइल तसेच बळीराजा साखर कारखान्यासमोरील रिलॅक्स इंडियन या पंपांवर मागील आठ दिवसांपासून अधूनमधून इंधनाची कमतरता भासत आहे. इंधन मिळेल या आशेने नागरिक आपली दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहने पंपावर उभी करून तासन्तास प्रतीक्षा करत आहेत. मात्र, वेळेत पुरवठा न झाल्याने अनेकांना वाहनांसह थांबून राहावे लागत आहे.

Parbhani petrol diesel scarcity
Purna gas agency issue : पूर्णेत गॅस एजन्सीचा अनागोंदी कारभार; सिलिंडरसाठी ग्राहकांचे हेलपाटे

कोल्हापूर आणि सोलापूर येथील डेपोमधून इंधनाचा पुरवठा वेळेवर न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. २६ मार्च रोजी दुपारनंतर तर सर्व पंपांवर इंधन पूर्णपणे संपल्याने मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी एस्सार पंपावर इंधन उपलब्ध होताच वाहनधारकांनी तेथे लांबच लांब रांगा लावल्या.

डिझेल टंचाईचा शेतीवर परिणाम

दरम्यान, डिझेलच्या तुटवड्याचा परिणाम शेती कामांवरही होत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नांगरणी आणि मशागतीची कामे ट्रॅक्टरच्या मदतीने करत असताना वेळेवर डिझेल न मिळाल्याने कामे रखडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे.

Parbhani petrol diesel scarcity
Purna Gas Shortage | पूर्णा येथे गॅस एजन्सीचा गोंधळ; सिलेंडरसाठी ग्राहकांच्या आठ दिवसांपासून रांगा

आखाती देशातील तणावामुळे इंधन वाहतुकीवर परिणाम होत असल्याच्या अफवांमुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात इंधन साठवून ठेवत आहेत. त्यामुळे पंपावरील साठा लवकर संपतो आणि नवीन टँकर यायला उशीर होत असल्याने तात्पुरती टंचाई निर्माण होते.

- प्रमोद राजूअण्णा एकलारे (एस्सार पेट्रोल पंपाचे मालक)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news