Parbhani Farmers News | अनुदानावरील सोयाबीन बियाणे वाटपातून पूर्णा तालुक्यातील अनेक नोंदणीकृत शेतकरी वंचित

२३४ महिला शेतकऱ्यांची निवड करून त्यांच्या जमीन क्षेत्रानुसार प्रत्येकी एक ते दोन बॅग सोयाबीन बियाण्यांचे वितरण
Purna Taluka Soybean Subsidized Seeds Issue
Purna Taluka Soybean Subsidized Seeds IssuePudhari
Published on
Updated on

Purna Taluka Soybean Subsidized Seeds Issue

पूर्णा : पूर्णा तालुक्यात खरीप हंगामासाठी महाडीबीटी पोर्टलवर अनुदानावरील सोयाबीन बियाण्यासाठी नोंदणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांना बियाणे न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. वंचित शेतकऱ्यांना तातडीने अनुदानावरील सोयाबीन बियाण्याचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी अनुदानावरील सोयाबीन बियाण्यासाठी नोंदणी केली होती. मात्र, केवळ २३४ महिला शेतकऱ्यांची निवड करून त्यांच्या जमीन क्षेत्रानुसार प्रत्येकी एक ते दोन बॅग सोयाबीन बियाण्यांचे वितरण करण्यात आले. काही शेतकरी गटांनाही बियाणे देण्यात आले. त्यामुळे मोठ्या संख्येने नोंदणीकृत शेतकरी या योजनेपासून वंचित राहिल्याची तक्रार आहे.

Purna Taluka Soybean Subsidized Seeds Issue
Purna crime | चाकूचा धाक दाखवून हळद बियाणे चोरणाऱ्यांना केले जेरबंद!

पूर्णा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन लागवड केली जाते. असे असताना काही शेतकरी बचत गटांना सोयाबीनऐवजी कापूस बियाण्यांचे वितरण करण्यात आल्याचाही आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. गतवर्षीप्रमाणे सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांची निवड न झाल्याने विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

मागील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदाच्या हंगामासाठी घरचे बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदान योजनेतून बियाणे मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, अपेक्षित लाभ न मिळाल्याने अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बियाणे आणि रासायनिक खतांच्या खरेदीसाठी आर्थिक स्रोत नसल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिल्याचे चित्र आहे.

Purna Taluka Soybean Subsidized Seeds Issue
Illegal Gutkha Purna | पूर्णा येथे पानटपऱ्यांना लागले कुलूप; गुटखा विक्रेत्यांमध्ये कारवाईची धास्ती; गुटखा, माव्यासाठी ग्राहकांची भटकंती

दरवर्षी कृषी विभागामार्फत खरीप हंगामात विविध योजनांअंतर्गत सोयाबीन, तूर, मूग, उडीद व कापूस बियाण्यांवर ५० टक्क्यांपासून ते १०० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. यंदाही महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना तातडीने सोयाबीन बियाण्यांचे वाटप करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

logo
Pudhari News
pudhari.news