पूर्णा-आडगाव लासीना शिवरस्ता खुला: शेतकऱ्यांतून समाधान

महसूल अधिकाऱ्यांकडून रस्त्याची मोजणी
Poorna Adgaon road open
अतिक्रमीत शिवरस्ता महसूल अधिका-यांनी खुला करून दिला. Pudhari Photo
Published on
Updated on

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील पूर्णा-आडगाव लासीना हा २ किमी लांबी व ३३ फूट रुंदीचा अतिक्रमीत शिवरस्ता महसूल अधिका-यांनी गुरुवारी (दि.२७) तत्काळ खुला करुन दिला. यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

याकामी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, तहसीलदार माधवराव बोथीकर यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार प्रशांत थारकर, तलाठी गणेश गोरे, सचिन मारडे जायमोक्यावर जाऊन मोजणी करत तत्काळ रस्ता खुला करुन दिला.

संबंधित शेतक-यांनी सदरील अतिक्रमित शिवरस्ता खुला करुन देण्यासाठी तहसिल कार्यालयात अर्ज दाखल केला होता. त्यावरुन महसूल अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता तत्काळ घटनास्थळी दाखल होत मोजणी करून खुना मारुन रस्ता खुला करुन दिला. त्यामुळे ७३ हेक्टर शेतजमिनीत जाण्यासाठी ६६ शेतकऱ्यांची सोय होणार आहे. दरम्यान पूर्णा शेतशिवार सज्जातील आतापर्यंत ६ किमी लांबीचे ४ शेतरस्ते मोकळे करण्यात आले आहेत.

Poorna Adgaon road open
परभणी : रिपब्लिकन सेनेचे उपोषण मागे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news