

पूर्णा : येथील तहसील कार्यालयासमोर खुजडा येथील खदानीची चौकशी करण्याच्या मागणीसाठी रोजी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजकूमार सुर्यवंशी यांनी सुरु केलेले उपोषण २६ रोजी दुसऱ्या दिवशी सायंकाळी सोडले.
दरम्यान, यावेळी नायब तहसीलदार प्रशांत थारकर, तलाठी गणेश गोरे यांनी उपोषणकर्ते सुर्यवंशी यास तहसीलदार माधवराव बोथीकर यांच्या स्वाक्षरीचे पत्र दिले आहे की, मौजे खुजडा शिवारातील गट क्रमांक १५३ मधील चालू असलेल्या खदानीतील मुरुम गौणखनिज उत्खनन केलेली मोजणी ही ड्रोन कॅमेऱ्याव्दारे २० मार्च रोजी झालेली असून जिल्हाधिकारी कार्यालयायाकडून ड्रोन मोजणीचा अहवाल प्राप्त होताच मोजणीअंती सदर गटामध्य परवानगीपेक्षा जास्तीचे उत्खनन झाले असल्याचे निष्पन्न झाल्यावर सबंधीता विरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ व पोटकलम (७)(८) नुसार कार्यवाही करण्यात येईल.तसेच सबंधित जज्जाचे तलाठी व मंडळ अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविण्यात येईल.यात ते दोषी आढळून आल्यास त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल. त्याच बरोबर ड्रोन मोजणीचा अहवाल प्रत देण्यात येईल.असे आश्वासक पत्र दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.