Parbhani News : भाजप, काँग्रेसला प्रत्येकी चार सभापतिपद; पूर्णेत अपक्षाचा झेंडा

परभणीत राष्ट्रवादीची खेळी; काँग्रेस-उबाठा सेना व अपक्षाच्या मदतीने सभापतिपद मिळविले
Parbhani district Panchayat Samiti chairperson election
भाजप, काँग्रेसला प्रत्येकी चार सभापतिपद; पूर्णेत अपक्षाचा झेंडाFile Photo
Published on
Updated on

परभणी : जिल्ह्यातील 9 पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती पदाच्या निवडी मंगळवारी (दि.10) पार पडल्या. यात सेलू, जिंतूर, गंगाखेड, पालम या पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा फडकला. पाथरी विधानसभा मतदार संघातील पाथरी, मानवत, सोनपेठ व परभणी या पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकविला. पुर्णा, पंचायत समितीवर ठाकरे सेनेच्या मदतीने उज्वला पिसाळ या सभापतिपदी आरुढ झाल्या. परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी खेळी करत ठाकरे सेनेला सोबत घेत सभापतिपद मिळविले आहे.

परभणी पंचायत समितीत महायुतीतील घटकपक्ष असलेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदेच्या शिवसेनेचा बहुमताचा आकडा पूर्ण असताना येथे भाजपला सत्तेपासून दूर ठेव्ाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेच्या मदतीने सभापती पद मिळविले. आ.डॉ.राहुल पाटील, आ.राजेश विटेकर यांनी एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेसचे 5, काँग्रेस 4, उबाठा 2 व अपक्ष 1 अशी जुळवाजुळव करत सभापतिपद मिळवले आहे.

पाथरीत राष्ट्रवादीची बाजी

पाथरी : पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता डुकरे तर उपसभापतिपदी सचिन अंबुरे हे विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापतिपद उमेदवार सुनीता डुकरे यांना 6 तर उबाठा पक्षाच्या मनीषा कोल्हे यांना 4 मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपसभापतिपद उमेदवार सचिन अंबुरे यांना 6 तर उबाठाचे ज्ञानेश्वर यांना 4 मते मिळाली. येथे सभापती-उपसभापती निवडीत काँग्रेसचे पाठबळ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले. पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांनी काम पाहिले. त्यांना तहसीलदार शंकर हांदशेवार, गटविकास अधिकारी शैलेश वाव्हळे, नायब तहसीलदार वसंत महाजन, मकरंद दलाल, संदीपान घुंबरे, सुमीत वाघमारे, अनंत चाकोते, विजय भुजबळ यांचे सहकार्य लाभले.

Parbhani district Panchayat Samiti chairperson election
Beed civic forest project : बीडमधील नागरी वनासाठी राज्य सरकारकडून अद्याप प्रस्तावच नाही

सोनपेठला सभापतिपदी निकिता अवचारे, उपसभापती पद्मसिंह देशमुख बिनविरोध

सोनपेठ : पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडीसाठी विशेष सभा पंचायत समिती सभागृहात झाली. पीठासन अधिकारी म्हणून रतनसिंग साळोक होते. यावेळी सभापतिपदी श्रीमती निकिता श्याम अवचारे यांची तर उपसभापतिपदी पद्मसिंह लक्ष्मीकांत देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रिया शांततेत आणि नियमानुसार पार पडली. निवड जाहीर होताच उपस्थित सदस्य व कार्यकर्त्यांनी नव्याने निवड झालेल्या सभापती आणि उपसभापतींचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. पंचायत समितीच्या माध्यमातून विकासकामांना गती देण्यासाठी सर्व सदस्यांच्या सहकार्याने काम करणार असल्याची भावना नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी पंचायत समितीचे सदस्य, अधिकारी तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेलूत सभापतिपदी विजयमाला डोंबे, उपसभापती सुलभाबाई घुगे

सेलू : सभापतीपदी कुपटा गणातील विजयमाला ग्यानोजी डोंबे तर उपसभापतिपदी बोरकिणी गणातील सुलभाबाई ज्ञानोबा घुगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून शोभा जाधव यांनी पाहिले. निवड प्रक्रियेनंतर नूतन सभापती व उपसभापती यांचे भाजपा पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी स्वागत करून अभिनंदन केले. यावेळी भाजपाचे आजी-माजी पदाधिकारी, बूथप्रमुख, महिला मोर्चा, युवा मोर्चा, विविध आघाड्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी विजयमाला ढोंबे व सुलभाबाई घुगे यांना शुभेच्छा दिल्या. तसेच पप्पू ढोंबे यांचेही कार्यकर्त्यांकडून विशेष अभिनंदन करण्यात आले. दरम्यान, या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पालमला सभापतिपदी रेवता ढोले, उपसभापती सुरेखा बरडे

पालम : सभापती व उपसभापती निवडीत रेवता लक्ष्मण ढोले यांची सभापतीपदी तर सुरेखा बालाजी बरडे यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली. निवड प्रक्रियेदरम्यान एकूण 8 पैकी 7 सदस्य बैठकीस उपस्थित होते. सभापतीसाठी रेवता ढोले यांचा तर उपसभापतीसाठी सुरेखा बरडे यांचा प्रत्येकी एकच अर्ज होता. विशेष सभेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून विद्या केंद्रे यांनी काम पाहिले. तर तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे व गटविकास अधिकारी उदय शिसोदे यावेळी उपस्थित होते. निवड जाहीर होताच सदस्यांनी सभापती व उपसभापतींचे स्वागत केले. पंचायत समिती माध्यमातून विकासकामांना गती देऊन ग्रामीण भागातील विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करू, असे नूतन सभापती, उपसभापती व सदस्यांनी म्हटले.

गंगाखेडला सभापतिपदी मनोज मुंढे, उपसभापती सारिका खांडेकर

गंगाखेड : सभापती व उपसभापतीसाठीची निवड प्रक्रियेत 25 वर्षीय तरुणाला नेतृत्वाची संधी देत भाजपचे मनोज लक्ष्मण मुंडे यांची सभापतिपदी तर उपसभापतिपदी भाजपच्याच सारीका रमेश खांडेकर यांची बिनविरोध निवड झाली. पं.स.निवडणुकीत 14 पैकी 9 जागांवर विजय मिळवत भाजपने स्पष्ट बहुमत सिध्द केले. आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वात भाजपने निवडणूक लढवली. बहुमत बळावर सभापती व उपसभापतीची निवड बिनविरोध झाली. विशेष म्हणजे पं.स.च्या इतिहासात तरुण नेतृत्वाला संधी देत मनोज मुंडे यांची सभापतिपदी निवड झालेी. सभापतीसाठी धम्मा रमेश पवार यांनी प्रस्ताव मांडला, तर उपसभापतीसाठी सदस्य विजय प्रल्हाद मुंडे यांनी अनुमोदन दिले.

बैठकीस भाजपचे 9 सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 व 1 अपक्ष उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी निर्वाचन अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना गटविकास अधिकारी अक्षय सुक्रे, सहायक गटविकास अधिकारी जयराम मोडक, महादेव काडवदे, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. निवडीनंतर मनोज मुंडे व सारिका खांडेकर यांचे मान्यवरांनी अभिनंदन करत पं.स.माध्यमातून विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.

Parbhani district Panchayat Samiti chairperson election
‌Nanded News : ‘पीपल्स‌’च्या प्राचार्यपदासाठी सारी यंत्रणा ‌‘अशोक वना‌’त उभी!

मानवतला सभापतिपदी राष्ट्रवादीच्या ललिता निर्वळ, उपसभापती सुरज काकडे बिनविरोध

मानवत : पंचायत समिती सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ललिता उध्दवराव निर्वळ व उपसभापतिपदी राष्ट्रवादीचेच सुरज सुंदर काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभापती व उपसभापती पदासाठी मंगळवारी दुपारी 2 वाजता येथील पंचायत समिती सभागृहात विशेष सभा झाली. सकाळी 10 ते 12 या अर्ज भरण्याच्या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत असल्याने सभापतीसाठी ताडबोरगाव गणातील ललिता निर्वळ व उपसभापतीसाठी पाळोदी गणातील सुरज काकडे यांचे एकमेव अर्ज आल्याने मतदान प्रक्रिया झाली नाही.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवडून आल्यानंतर आ.राजेश विटेकर व बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुतन सभापती व उपसभापतींचा सत्कार पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आला. पंचायत समिती निवडणुकीत एकूण 8 पैकी 6 गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे तर 2 गणात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले. सभापतीपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने राष्ट्रवादीच्या ललिता निर्वळ व ज्योती शिंदे या इच्छुक होत्या. परंतु पक्षश्रेष्ठीच्या निर्णयामुळे ललिता निर्वळ यांची निवड करण्यात आली.

सभेस पीठासीन अधिकारी म्हणून निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार यांनी काम पाहिले. बैठकीस तहसीलदार पांडुरंग माचेवाड, गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, नूतन पं.स.सदस्य ज्योती शिंदे, सर्जेराव हरकळ, उर्मिला रणखांबे, शहानुरखा मुनीरखा पठाण, प्रमिला उकलकर व सरस्वती नाईक उपस्थित होते.

गंगाखेडला सभापतिपदी मनोज मुंढे, उपसभापती सारिका खांडेकर

पूर्णा : सभापती, उपसभापती निवडीत उबाठा शिवसेना आणि अपक्ष गटाच्या बाजूने एकूण 12 पैकी 8 सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. यामुळे अपक्ष उज्ज्वला नारायण पिसाळ सभापती तर उबाठाचे काशिनाथ शंकर काळबांडे उपसभापती बनले. यावेळी सभागृहात भाजपचे 7 सदस्य हजर असूनही 3 जणांनी ठरलेल्या उमेदवारास मतदान न करता अपक्ष, उबाठाला समर्थन दर्शविले. यामुळे भाजपा अल्पमतात आला अन्‌‍ त्यांच्या उमेदवारास केवळ 4 मतदान झाले.

भाजपा जिल्हाध्यक्षांनी बजावलेला व्हिप 3 सदस्यांनी झुगारल्याचे दिसले. तत्पूर्वी, सकाळी 10 ते 12 या वेळेत अर्ज दाखल झाले. यात 8 सदस्यातील उबाठा, अपक्षाकडून सभापतीसाठी उज्ज्वला पिसाळ तर उपसभापतीसाठी काशीनाथ काळबांडे यांचे अर्ज आले. दुसऱ्या बाजूने भाजपचे हजर 4 सदस्यांतून विलास गिरी सभापती, उपसभापतीकरिता प्रभावती दुधाटे यांचे अर्ज आले. दुपारी पात्र उमेदवारांसाठी एकूण 12 सदस्यांचे हातवर करून मतदान घेत स्वाक्षऱ्या घेतल्या.

पीठासन अधिकारी प्रतिभा गोरे, गटविकास अधिकारी नारायण मिसाळ यांनी काम पाहिले. निवडीनंतर सभागृहाबाहेर विजयी गटांचे नेते, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली.पं.स.निवडणूक निकालानंतर एकूण 12 पैकी भाजपच्या चिन्हावर 4 सदस्य निवडून आले होते. नंतर तीन दिवसांतच आ.गुट्टे यांच्या नेतृत्वात यशवंत सेना 2 तर राष्ट्रवादीच्या 1 सदस्याने भाजपात प्रवेश केला. यामुळे भाजपची सदस्य संख्या 7 झाली. विद्यमान आमदाराकडे हक्काचे बहुमत होते मग स्पष्ट बहुमत असतानाही असे नेमके काय घडले, जेणेकरून 3 सदस्यांनी विरोधी बाजूने कौल दिला?असा सवाल उठवला जात आहे.

जिंतूरला सभापतिपदी आयोध्या खिस्ते, उपसभापती सोनीताई दराडे बिनविरोध

जिंतूर : सभापती व उपसभापतीसाठी निवडणूक झाली. पं.स.निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. एकूण 20 पैकी 14 सदस्य निवडून आले. पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनात सभापतीपदी आयोध्या किशोर खिस्ते तर उपसभापतिपदी सोनीताई माधव दराडे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शैलेश लाहोटी यांनी काम पाहिले. निवडीनंतर नूतन सभापती व उपसभापतींचा सत्कार माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांनी केला.

याप्रसंगी पं.स.सभागृहात भाजपाचे गटनेते भास्कर ठोंबरे, सरिता नागरे, आशामती घुगे, अश्विनी दाभाडे, पूजा ढोणे, मीरा वजीर, रंजना सांगळे, बाळासाहेब साखरे, भगवान देशमुख, तहसील देशमुख, धम्मपाल प्रधान, परमेश्वर ठाकरे आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी डॉ.पंडित दराडे, भाजप तालुकाध्यक्ष गोविंद थिटे, सुनील भोंबे, सुनील मते, भगवानराव वटाणे, रोहित चव्हाण, कैलास खंदारे, आत्माराम पवार, प्रसाद बुधवंत, प्रभाकर दराडे, प्रकाश दाभाडे, सुंदरराव चव्हाण, रमेशराव ढवळे, गजानन वराड, शिवाजी काळे, सुदामराव गायकवाड, सुरेश खिस्ते, शिवाजी कदम, भास्कर थिटे, बंडू लांडगे, माऊली मार्कड, प्रल्हादराव ढोणे, मतीन तांबोळी, सचिन आडे, संतोष राठोड, अशोक खूपसे, पांडुरंग भगस, अमोल जगताप, बाबाराव काटमोरे, मोहन खंदारे, विनोद गडदे, रामा काठमोरे, राधाकिशन गायकवाड, माऊली गायकवाड, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामीण भागातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन उपस्थित होते.

माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनात व पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वात पंचायत समितीचे उपसभापतीपद सांभाळताना माझ्या गणासह ग्रामीणमधील प्रत्येक भागात शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल. आजपावेतो पंचायत समितीवर जे प्रशासकीयराज होते ते आज संपुष्टात आल्याने लोकप्रतिनिधी या नात्याने जी कामे प्रलंबीत आहेत ती पूर्णत्वाकडे नेली जातील अशी ग्वाही सोनी माधव दराडे यांनी दै.पुढारीशी बोलताना दिली. तसेच स्मशानभूमी व पाणंद रस्ते कामांनाही प्राधान्य दिले जाईल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news