Parbhani News : अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्यावरून पडेगावात तणाव

प्रशासनाकडून पुतळा झाकण्याचा निर्णय
Ahilyabai Holkar statue dispute
अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्यावरून पडेगावात तणावpudhsri photo
Published on
Updated on

गंगाखेड : तालुक्यातील पडेगाव येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसवल्याच्या वादातून दोन गट आमने-सामने आल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने तोडगा निघेपर्यंत पुतळा कापडाने झाकला असून, गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पडेगाव येथील मारुती मंदिरासमोरील परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आहे. याच परिसरात अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसवण्यात आल्याने दोन महिन्यांपासून वाद सुरू होता. पुतळा स्थलांतरित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली होती, मात्र कोणतीही कार्यवाही न झाल्याने पुन्हा तणाव निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर काही ग्रामस्थांनी पुतळा स्थलांतरासाठी उपोषणही केले होते.

Ahilyabai Holkar statue dispute
Balraje Aware Patil arrest: अंजनगाव प्रकरणी बाळराजे आवारे पाटील यांना अटक

प्रशासकीय मध्यस्थी आणि कारवाई

वाढता वाद पाहता १५ एप्रिलच्या रात्री उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसीलदार उषाकिरण शृंगारे आणि पोलीस प्रशासनाने ग्रामस्थांशी रात्रभर चर्चा केली. अखेर ३१ मेपर्यंत पुतळा आहे त्याच स्थितीत झाकून ठेवण्याचा आणि त्यानंतर स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी जमावबंदी लागू केली असून, दोन्ही गटांतील १४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. सध्या गावात ४ अधिकारी आणि ४० पोलीस कर्मचाऱ्यांचा खडा पहारा आहे.

Ahilyabai Holkar statue dispute
Shivaji Maharaj Statue Controversy: टाकळीभानमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; हटवू न देण्याची ग्रामस्थांची भूमिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news