Cattle smuggling parbhani: गोवंशाची अवैध वाहतूक करणारा आयशर चारठाणा पोलिसांनी पकडला

Parbhani crime news: दहा पशुधनाची सुटका; तीन आरोपींवर गुन्हा दाखल, आठ लाखांचा मुद्देमाल जप्त
Cattle smuggling parbhani: गोवंशाची अवैध वाहतूक करणारा आयशर चारठाणा पोलिसांनी पकडला
Published on
Updated on

चारठाणा : चारठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उद्धव माने, खरात आणि दोन होमगार्ड रात्रीची गस्त घालत असताना रायखेडा शिवारात शनिवारी (२३ ऑगस्ट) रात्री साडेतीन वाजता जालन्याहून वसमतकडे जाणारा आयशर क्रमांक एमएच ०२ ईआर ६४०५ संशयास्पद स्थितीत आढळून आला. या आयशरमध्ये कोंबून भरलेले दहा पशुधन आढळून आले.

पोलिसांनी झडती घेतली असता आयशरमधील चालक व अन्य दोन जण उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. पोलिसांनी गोवंशाची अवैध वाहतूक करणारा आयशर पोलीस ठाण्यात आणला. तसेच दहा पशुधनांची सुटका करून त्यांना इटोली येथील गोशाळेत पाठविण्यात आले.

Cattle smuggling parbhani: गोवंशाची अवैध वाहतूक करणारा आयशर चारठाणा पोलिसांनी पकडला
Cattle smuggling parbhani: गोवंशाची अवैध वाहतूक करणारा आयशर चारठाणा पोलिसांनी पकडला

ही कारवाई शनिवारी, २३ ऑगस्ट रोजी रात्री ३ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास संभाजीनगर-नांदेड राज्य महामार्गावरील रायखेडा शिवारात करण्यात आली. आयशर क्रमांक एमएच ०२ ईआर ६४०५ मधून अवैधरीत्या गोवंशाची वाहतूक केली जात असल्याची माहिती रात्री गस्त घालत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी आयशर थांबवून त्याची विचारपूस केली असता वाहन संशयास्पद आढळून आले. त्यानंतर दहा पशुधनांची सुटका करून त्यांना इटोली येथील गोशाळेत पाठविण्यात आले. जनावरांची किंमत चार लाख रुपये व जुना वापरलेला आयशर चार लाख रुपये, असा एकूण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Cattle smuggling parbhani: गोवंशाची अवैध वाहतूक करणारा आयशर चारठाणा पोलिसांनी पकडला
Nanded cattle smuggling : १२ गोवंश अन् वाहनासह ८.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त; तीन जणांवर गुन्हा दाखल

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उद्धव माने यांच्या फिर्यादीवरून आरोपी रमेश सुरेश गायकवाड (वय ३८, रा. गणेशपूर, ता. वसमत, जि. हिंगोली), आदेश गौतमराव मस्के (वय २४, रा. आंबेडकर नगर, वसमत) आणि साजिद वहाब शेख (रा. वसमत) या तिघांविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात कलम ५ (अ), ५ (ब), ९ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, तसेच कलम ११ (१) (ड) प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक अधिनियम, कलम १२५ (इ) मोटार वाहन कायदा आणि अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघ तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news