Pre monsoon rain in Parbhani | पूर्णा तालूक्यात मान्सूनपूर्व पाऊसाला जोरदार सुरुवात; उष्णता उकाड्यापासून दिलासा

अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची एकच धांदल उडून शेतात बांधलेली जनावरे झोडपून निघाली
Pre monsoon rain in Parbhani | पूर्णा तालूक्यात मान्सूनपूर्व पाऊसाला जोरदार सुरुवात; उष्णता उकाड्यापासून दिलासा
Published on
Updated on

पूर्णा : शहर व तालूका परिसरात रविवारी ७ जून रोजी दुपारी ५ वाजेपासून सर्वदूर मृगनक्षत्र मुहूर्तावर जोरदार पाऊसाने हजेरी लावली. या दमदार पावसामुळे कडक ऊन पडून ४२ अंश डिग्री सेल्सिअसवर तापमान गेले असता सर्व सजिव कासावीस होत होती. आता या पावसामुळे प्रचंड उष्णता आणि उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

Pre monsoon rain in Parbhani | पूर्णा तालूक्यात मान्सूनपूर्व पाऊसाला जोरदार सुरुवात; उष्णता उकाड्यापासून दिलासा
Nashik rain alert | जिल्ह्यातील काही भागांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

हा पाऊस आकाश ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह सुरु झाला. या आधी (दि. ६) जून रोजी देखील ब-याच ठिकाणी वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला होता. यात कात्नेश्वर, एरंडेश्वर, माटेगाव, नावकी, आहेरवाडी, वडगाव, पिंपळगाव बाळापूर, लक्ष्मीनगर आदी भागातील झाडे उन्मळून मोडून पडली होती. सदरील नैसर्गिक आपत्तीत एरंडेश्वर येथील उभ्या केळीबागा मोडून आडव्या झाल्या. त्याचबरोबर वरील गाव शिवारातील कृषी पंपाचे सोलार पॅनल मोडून मोठे नुकसान झाले. ब-याच ठिकाणी विद्युत खांब, तारा व रोहित्र मोडून पडले होते, त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. यानंतर रविवारी पून्हा दमदार पावसाने हजेरी लावली.

Pre monsoon rain in Parbhani | पूर्णा तालूक्यात मान्सूनपूर्व पाऊसाला जोरदार सुरुवात; उष्णता उकाड्यापासून दिलासा
विजांच्या कडकडाटासह येवल्यात बेमोसमी पावसाची दमदार हजेरी ; वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली

अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची एकच धांदल उडून शेतात बांधलेली जनावरे झोडपून निघाली. या पावसामुळे आता शेतकरी खरीप पेरणीसाठी खते बियाणे तयारी, गोठा दुरुस्ती कामाकडे वळाले आहेत. यातच, यंदा सोयाबीन, कापूस व ईतर बियाणे व रासायनिक खतांच्या किंमती गगनाला भिडल्यामुळे चिंतातूर असल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news