Nashik rain alert | जिल्ह्यातील काही भागांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

यलो अलर्ट : मनमाड, चांदवड, मालेगावमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस
Nashik rain alert
Nashik rain alert
Published on
Updated on

नाशिक : भारतीय हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने नाशिकला मेघगर्जनसह पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने नाशिकला यापूर्वीच दोन दिवसांचा वलो अलर्ट दिला होता. रविवारी (दि. ३१) दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, जिल्ह्यातील मनमाड, चांदवड, मालेगाव या तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून, लवकरच मान्सूनपूर्व पाऊस जिल्हा व्यापणार असल्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार नाशिकसह छत्रपती संभाजीनगर, पुणे, नदिड, हिंगोली, परभणी, जालना आणि बीड जिल्ह्यांतील काही भागांमध्ये वातावरणात अचानक बदल होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मान्सूनपूर्व पाऊस कालावधीत तापमान आणि आर्द्रतेमुळे निर्माण होणाऱ्या अस्थिर वातावरणामुळे मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. यावेळी विजा पडण्याचा धोका अधिक आसल्याने शेतकरी, बांधकाम कामगार आणि मोकळ्या मैदानात काम करणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचेही आवाहन करण्यात आले. जोरदार वाऱ्यांमुळे झाडांच्या फांद्या तुटणे, वीजवाहिन्यांचे नुकसान होणे किंवा तात्पुरत्या स्वरूपाच्या संरचनांची हानी होचण्याची शक्यताही वर्तविण्यात आल्याने, विशेष खबरदारीचे आवाहनही हवामान विभागाने केले आहे.

राज्यात मान्सूनपूर्व वातावरण सक्रिय झाले असून, गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि अधूनमधून पावसाच्या सरी अनुभवास येत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या इशान्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी पुढील काही तास सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Nashik rain alert
SSC HSC Board Exam| दहावीचा निकाल लागून २२ दिवस, तरीही विद्यार्थ्यांना गुणपत्रिकाच नाही!

मनमाडला कांदा मक्याचे नुकसान

मनमाड : शहर, परिसरात एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर रविवारी (दि. ३१) मान्सून पूर्व पावसाचे आगमन झाले. रविवारी शहराचा आठवडे बाजार होता. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारात आलेल्या ग्राहकांसह दुकानदारांची तारांबळ उडाली. विक्री झालेला व खळ्यावर ठेवलेला मका भिजल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी उघड्यावरील कांदा भिजून खराब झाला. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

मेशी परिसरात गारांमुळे कैऱ्यांचे नुकसान

मेशी : सटाणा तालुक्यातील मेशी परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास बसला. पाऊस व वान्यासह काही ठिकाणी गारा पडल्या, यात मुक्या जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. काही ठिकाणी जनावरांचा चारा निजला. आंब्याच्या कैप्यांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Nashik rain alert
Nashik MLC election -नाशिक शिंदे शिवसेनेला; नरेंद्र दराडेंचे नाव निश्चित

चांदवडला पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ

चांदवड : तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये रविवारी (दि. ३१) सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. आठवडाभरापासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. पूर्व भागातील कळमदरे, राहुड, डोंगरगाव, सुतारखेडे, हरनूल, हरसूल, दुगाव, आहेरखेडे, गंगावे, शिंगवे, दरेगाव, निमोण, रायपूर तसेच परिसरातील इतर गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. पावसाच्या अचानक आगमनामुळे उघड्यावर ठेवलेला जनावरांचा चारा, कांदा तसेच इतर शेतमाल सुरक्षित करण्यासाठी शेतकरी व नागरिकांची मोठी धावपळ झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news