Illegal mining Parbhani : महसूल अधिकाऱ्यांच्या वरदहस्त ! मोंटेकार्लो कंट्रक्शनकडून लाखो ब्रास अवैध गौण खनिज उत्खनन

तहसील- जिल्हास्तरावर चौकशी गुलदस्त्यात आता विभागीय आयुक्ताकडे मागणी
Illegal mining Parbhani : महसूल अधिकाऱ्यांच्या वरदहस्त ! मोंटेकार्लो कंट्रक्शनकडून लाखो ब्रास अवैध गौण खनिज उत्खनन
Published on
Updated on

पूर्णा : तालुक्यातील गौर शिवारातील सरकारी जमिनीवर महसूल अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने मागील दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिज उत्खनन करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. क्षमतेपेक्षा अधिक लाखो ब्रास दगडी मेटलचे उत्खनन करून क्रेशरद्वारे त्याची उचल करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Illegal mining Parbhani : महसूल अधिकाऱ्यांच्या वरदहस्त ! मोंटेकार्लो कंट्रक्शनकडून लाखो ब्रास अवैध गौण खनिज उत्खनन
Goa Illegal Mining | गोव्यात खाणकाम प्रकरणाची एसआयटी चौकशी बंद होणार? हायकोर्टाच्या निर्णयाने हालचालींना वेग!

सदरील जमीन आधी महादलिंग स्वामी देवस्थान पुजारी यांच्या मालकीची होती. आता सरकारी नामांतरण करण्यात आलेल्या गट क्रमांक ४०२ तसेच इतर गट क्रमांकांच्या जमिनीवर समृद्धी महामार्गासाठी मोंटेकार्लो प्रोजेक्ट कंट्रक्शनकडून मंजुरीपेक्षा अधिक क्षेत्रात, सुमारे दहा एकरवर खदाण खोदून गौण खनिज उत्खनन करण्यात येत असल्याचा आरोप आहे. जिल्हा महसूल गौण खनिज विभाग प्रशासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या परवानगीतील ब्रासपेक्षा लाखो ब्रास अधिक मेटलचे उत्खनन करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

Illegal mining Parbhani : महसूल अधिकाऱ्यांच्या वरदहस्त ! मोंटेकार्लो कंट्रक्शनकडून लाखो ब्रास अवैध गौण खनिज उत्खनन
Chandwad Illegal Mining| वाळू माफियागिरी जोमात महसूल प्रशासन कोमात! चांदवड तालुक्यात अवैध वाळू उपसा सुरूच

हा सर्व अवैध प्रकार सुरू ठेवण्यासाठी स्थानिक तहसील स्तरावरील महसूल अधिकाऱ्यांशी सलगी करून मोंटेकार्लो कंट्रक्शनने लाखो ब्रास गौण खनिजाचे उत्खनन करून चोरी केल्याची तक्रार कात्नेश्वर येथील शेतकरी प्रसाद चापके यांनी यापूर्वी अनेक वेळा तहसीलदार, जिल्हाधिकारी तसेच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. मात्र, स्थानिक स्तरापासून वरिष्ठ पातळीपर्यंत महसूल अधिकाऱ्यांनी मोंटेकार्लो कंपनीशी हातमिळवणी केल्यामुळे चौकशी गुलदस्त्यात ठेवण्यात आल्याचा आरोप तक्रारदार चापके यांनी केला आहे.

Illegal mining Parbhani : महसूल अधिकाऱ्यांच्या वरदहस्त ! मोंटेकार्लो कंट्रक्शनकडून लाखो ब्रास अवैध गौण खनिज उत्खनन
Nanded Illegal sand mining : नांदेडमध्ये वाळूमाफियांवर कारवाई; साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त

जिल्हास्तरावरून चौकशी होत नसल्याने त्यांनी आता विभागीय आयुक्तांकडे चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, अवैध पद्धतीने लाखो ब्रास गौण खनिजाचे उत्खनन करून दोन मोठ्या क्रेशरच्या माध्यमातून कठीण दगडाची चुरी करण्यात आली असून, लक्षावधी ब्रासचा अवैध साठा करण्यात आल्याचा आरोप आहे. यातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे. स्थानिक महसूल अधिकारी स्वतःचे उखळ पांढरे करून शासनाची फसवणूक करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

दरम्यान, अतिरिक्त अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी मोंटेकार्लो प्रोजेक्ट कंपनीला ५ कोटी रुपयांचा महसूल रॉयल्टी दंड आकारण्यात आला होता. त्यानंतर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे खदाणीची मोजणी करण्यात आली असता अधिक कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. त्यापैकी २८ कोटी रुपयांचा दंड प्रलंबित असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर मागील पंधरा दिवसांपूर्वी तक्रारीमुळे पुन्हा ड्रोन कॅमेऱ्याद्वारे खदाणीची मोजणी करण्यात आली. मात्र, या मोजणीत खदाणीतून किती ब्रास उत्खनन करण्यात आले, याची माहिती गौण खनिज विभागाचे अधिकारी दडपून टाकत असल्याचा आरोप आहे.

Illegal mining Parbhani : महसूल अधिकाऱ्यांच्या वरदहस्त ! मोंटेकार्लो कंट्रक्शनकडून लाखो ब्रास अवैध गौण खनिज उत्खनन
Gevrai illegal sand mining : गेवराई पोलिसांच्या २४ तासांत वाळूमाफियांवर दोन कारवाया

येथील सरकारी जमिनीवर रात्रंदिवस गौण खनिजाचे उत्खनन करून क्रेशरच्या माध्यमातून कठीण दगडाची चुरी केली जात असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. क्रेशरला परवानगीचे बंधन असताना मनमानी पद्धतीने केव्हाही ब्लास्टिंग करून गौण खनिजाचे उत्खनन केले जात असून, मोठ्या हायवा टिपरच्या माध्यमातून त्याची वाहतूक केली जात असल्याचा आरोप आहे.

तसेच, मरसूळ पाझर तलावातीलही परवानगीपेक्षा अधिक ब्रास गौण खनिज मेटलचे उत्खनन करून ते उचलून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या गंभीर प्रकाराची चौकशी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर चौकशी गुलदस्त्यात; आता विभागीय आयुक्तांकडून चौकशी होणार की ‘पहिले पाढे पंचावन्न’ होणार? असा प्रश्न तक्रारदार प्रसाद चापके यांनी उपस्थित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news