

गंगाखेड : चहा व सिगरेट उधार का देत नाहीस म्हणून आरोपींनी पिता-पुत्रांना मारहाण करत असताना पोटात मार लागल्याने पित्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 29 एप्रिल च्या सकाळी घडली आहे. अरविंद मारुती साळवे यांनी फिर्याद दिली आहे.
त्यांच्या फिर्यादीनूसार वडील मारुती तुकाराम साळवे हे बस स्टॅन्ड च्या बाजूस असलेल्या रजा मज्जित जवळ असलेल्या हॉटेल वर सकाळी 5 ते 10 पर्यंत असतात. 29 रोजी सकाळी 8 वाजता आरोपी आवेज खान गफार खान पठाण जुनेद जरावर खान हे दोघ हॉटेलवर पांढऱ्या रंगाची कार एम एच 09 डी ए 2850 यामधून आले. ते सतत चहा व सिगारेटचे पैसे देत नसल्याने माझ्या वडिलांनी त्यांना चहा व सिगरेट दिले नाही. नेहमीच असा त्रास माझ्या वडिलांना देत असल्यामुळे मी व वडिलांनी पाठीमागे पाठलाग केला असता दोघेही गोदावरी घाटावर चहा पीत थांबले होते.
त्यांना विचारना केली असता त्यांनी आम्हाला शिवीगाळ करून वडीलांच्या पोटामध्ये लाथ घातली. छातीमध्ये व पोटामध्ये अवघड जागी लाथा बुक्क्या घालत असताना मी थांबवण्यास गेलो मला देखील मारहाण केली. सरकारी दवाखान्यात घेऊन गेलो असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. यावरून आरोपी अवेज खान गफार खान पठाण, जुनेद जरावर खान, किशोर मंचक भालेराव या तिघांवर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास परिविक्षा दिन पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे हे करीत आहेत.