

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : शहरानजीक खळी पाटीवर मंगळवारी (दि.२२) दुपारी ३ वाजता कोयत्याने वार करून एकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गंगाखेड पोलीस ठाणे हद्दीत दिवसाढवळ्या खुनाच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबतची प्राथमिक माहिती अशी की, गंगाखेड शहरात यज्ञभूमी परिसरात राहणारे प्रवीण रूकमाजी कौडकर (वय ५५) यांचा शहरानजीक खळी पाटीवर कोयत्याने सपासप वार करून खून केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहावर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. गंगाखेड पोलीस अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.