Parbhani municipal corporation : भाजपकडून भरोसे यांना स्वीकृतची संधी

परभणी मनपा : तीन अर्ज दाखल, शिवसेनेच्या नावाविषयी उत्सुकता
Parbhani municipal nominated members
परभणी : मनपा आयुक्तांकडे अर्ज दाखल करताना भाजप गटनेत्या तिरुमल्ला खिल्लारे, शिवाजी भरोसे, मोकिंद खिल्लारे प्रवीण गायकवाड.pudhari photo
Published on
Updated on

परभणी : परभणी शहर मनपाच्या 6 स्वीकृत सदस्यांच्या निवडीकडे लक्ष लागले असून भाजपाने महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्यावर भरोसा दाखवत त्यांना स्वीकृत सदस्यपदाची संधी दिली आहे. सोमवारी (दि.16) स्वीकृतसाठी भरोसे यांच्यासह 3 अर्ज दाखल झाले.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मनपातील भाजपाच्या गटनेत्या तिरमल्ला खिल्लारे यांना पत्र पाठवून भरोसे यांच्या निवडीबाबत कळवले आहे. भाजपात स्वीकृत सदस्य पदासाठी मोठी स्पर्धा असताना भाजपाने भरोसेंना संधी देत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे.

Parbhani municipal nominated members
Dairy business success story : हिंगणीत प्रतिकूल परिस्थितीत उभारला दुग्ध व्यवसाय

परभणी शहर मनपामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची काँग्रेसच्या जोडीने सत्ता आहे. सत्तारुढ ठाकरेंच्या शिवसेनेमध्येही स्वीकृत सदस्य पदासाठी मोठी चुरस असून खा. संजय जाधव व आ. डॉ. राहुल पाटील यांच्या चर्चेतून ठाकरे सेनेचे स्वीकृत सदस्य पदासाठीचे उमेदवार ठरणार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून गटनेते विजय जामकर यांनी शेख फहाद शेख हमीद यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी बाळासाहेब बुलबुले, अक्षय देशमुख, आकाश लहाने, अब्दुल कलीम, अब्दुल रहिम, अर्जुन सामाले, शेख वसीम, अखिल काजी उपस्थित होते. तर जनस्वराज्य पक्ष व यशवंत सेनेच्या वतीने राहुल मुरकुटे यांनी अर्ज दाखल केला. यावेळी सागर गंगाळे, मोहमद फारूख, बबलू टाक, मिलिंद बामणीकर, रितेश जैन उपस्थित होते.

भाजपामध्ये स्वीकृत सदस्य पदासाठी अनेकजण इच्छुक असताना प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या नावाला पसंती दिली आहे. शिवाजी भरोसे यांनी मनपातील भाजपाच्या गटनेत्या तिरुमल्ला खिल्लारे, मोकिंद खिल्लारे, प्रवीण गायकवाड यांच्या उपस्थितीत मनपा आयुक्त नितीन नार्वेकर यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

Parbhani municipal nominated members
Latur News : दोन तास थांबून बीडीओ वंगवाडे यांनी सोडवला विद्यार्थ्यांचा पाणीप्रश्न

भाजपने भरोसे यांच्यावर भरोसा दाखवल्यामुळे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, माजी आ. सुरेश वरपुडकर यांचे आभार मानले आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत शहराच्या विकासासाठी कार्यरत राहणार असल्याचे भरोसे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news