Parabhani News | रस्त्यांवरील चिखल ग्रामपंचायतीसमोर; चांदजमधील नागरिकांचा संताप उफाळला

गावांतर्गत रस्त्याची दुरावस्थेमुळे नागरिकांतून संताप
Parabhani News
गावातील रस्‍त्‍यांची झालेली दुरवस्‍थेमुळे संतापलेल्‍या ग्रामस्‍थांनी ग्रामपंचायतच्यास दारातच चिखल ओतलाPudhari Photo
Published on
Updated on

Mud on the roads in front of the Gram Panchayat; Anger of the citizens of Chandaj flared up

बोरी : इथून जवळच असलेल्या चांदज येथील गावांतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली. नुकत्याच पडलेल्या पावसाने रस्ते आहेत की शेतातील धुऱ्यांचे रस्ते हे समजणे कठीण बनले आहे. दिव्यांगांसह, शालेय विद्यार्थ्यांना, व नागरिकांना रस्त्यावर चालताना कसरत करावी लागत असल्याने संतप्त झालेल्या चांदाच्या गावातील युवक व नागरिकांनी गुरुवारी सकाळी रस्त्यावरील चिखल जेसीबी ने भरून ट्रॅक्टरच्या सहाय्याने उचलून थेट ग्रामपंचायत प्रवेशद्वारावर टाकत निषेध नोंदवन्यात आला.

Parabhani News
Parabhani News: हदगाव तलावात पाणपक्ष्यांचा विहार

गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत बीजेपी चे सरकार असून सदरील ग्रामपंचायतच्या वतीने मागील पाच वर्षांपासून गावातील मुख्य रस्ते शाळेत जाणारे रस्ते व गावातील गल्लीबोळा या ठिकाणी कसल्याही प्रकारचे विकास कामे केली नसून सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचून चांदाच्या गावातील रस्ते हे शेतातील पाद न रस्त्यांपेक्षाही जास्त चिखलमय झाले आहेत. या रस्त्यावर दोन दोन फूट खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून या चिखलमय व साचलेल्या घाण पाण्यातून नागरिकांना व दिव्यांगांना, विद्यार्थ्यांना, दारावरची कसरत करत पायी चालावे लागत आहे. व नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Parabhani News
गावातील रस्‍त्‍यांची झालेली दुरवस्‍था तर दुसर्‍या छायाचित्रात ट्रॉलीने ग्रामपंचायतच्या दारात चिखल टाकण्यात आला Pudhari Photo

यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावरील चिखल जेसीबी व ट्रॅक्टरच्या साह्याने भरून थेट ग्रामपंचायतच्या प्रवेशद्वारावर टाकून निषेध नोंदवला या आंदोलनामध्ये. सदरील आंदोलन अंकुश अंभूरे यांच्या पुढाकारातून करण्यात आले. यावेळी या आंदोलनात माजी पंचायत समिती सभापती शरदराव अंभूरे, पंजाबराव अंभूरे, प्रदीप अंभूरे , विशाल अंभूरे , सोपान अंभूरे , गुरु अंभोरे , शिवाजी अंभूरे, अतुल अंभूरे , पोलीस पाटील सुरेश सामान्य आणि लांबोरे राजेभाऊ अंभोरे दाजीबा रोडगे, प्रकाश पाठक, सुनील पाठक संतोष, श्रीहरी अंभूरे, भगवान आंबुरे, शेख इर्शाद, शेख सुलेमान, गणेश राव बनसोडे, संतोष बनसोडे, तुकाराम बनसोडे, विश्वनाथ अंभूरे, कृष्णा अंभुरे, प्रसाद दीपक अंभुरे शुभम अंभोरे आधी जण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Parabhani News
Parabhani News| प्रशासनाच्या आश्वासनानंतर सातव्या दिवशी सुटले उपोषण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news