Parabhani News| प्रशासनाच्या आश्वासनानंतर सातव्या दिवशी सुटले उपोषण

शेतमालाला योग्य भावाच्या प्रश्नावर आसेगावात आंदोलन
Parabhani News
प्रशासनाच्या आश्वासनानंतर सातव्या दिवशी सुटले उपोषणpudhari
Published on
Updated on

जिंतूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील दुधगाव महसुल मंडळातील आसेगाव येथे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा, यासह अन्य शेतीविषयक प्रश्नांवर इरशाद पाशा चांद पाशा यांचे सुरू असलेल बेमुदत उपोषण जिल्हा महसुल प्रशासनाच्या ठोस आश्वासनानंतर बुधवारी (दि.९) सायंकाळी उशिरा सातव्या दिवशी मागे घेण्यात आले.

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देण्यात यावा, एनडीआरएफ व एसडीआरएफ च्या निकषानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांन मदत देण्यात यावी. जाचक अटी रद्द करून १०० टक्के पीकविमा देण्यात यावा. सोयाबीनला ७ हजार तर कापसाला १२ हजार रूपये भाव देण्यात यावा. खरीप २०२१ व २०२३ मधील वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी पीकविमा देण्यात यावा. करपरा नदीवरील बंधारा दुरूस्त करण्यात यावा आदी विविध मागण्यांसाठी आसेगावात इरशाद पाशा यांनी सात दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. या उपोषणात शेतकरी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुधगाव मंडळातील दुधगाव, कौडगावन, सोना, आसेगाव, वस्सा, लिंबाळा, रेपा, नागणगाव, बोर्डी, डोहरा, मुडा आदी गावांतील शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. अखेर प्रशासनाने सातव्या दिवशी बुधवारी या आंदोलनार्च दखल घेतली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांर्न त्यासाठी जिंतूरचे तहसीलदार, मंडळ अधिकारी, कृर्ष पर्यवेक्षकांचे शिष्टमंडळ पोलिसांसह आंदोलनस्थळ पाठवून मागण्यांबाबत चर्चा केली. स्थानिक स्तरावरील मागण्या लिखीत स्वरूपात मागण्या करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ स्तरावरील मागण्यांबाबत पत्र व्यवहार करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर इरशाद पाशा यांनी उपोषण मागे घेतले.

यावर्षी बीड जिल्ह्यात दोन दसरा मेळावे लक्षवेधी होणार आहेत. यामध्ये नारायणगड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा होणार असून याबरोबरच भगवान भक्ती गड येथे पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत असलेला दसरा मेळावा देखील प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

या मेळाव्यात आजवर पंकजा मुंडे या प्रमुख उपस्थितीत असायच्या धनंजय मुंडे आजवर कधीही या मेळाव्याला उपस्थित राहिले नव्हते. परंतु यंदा प्रथमच धनंजय मुंडे हे देखील या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. राज्यात काही कालावधीतच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता हे मुंडे बहिण भाऊ या मेळाव्यातून काय बोलतात आणि आगामी राजकीय दिशा कशी स्पष्ट करतात याकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news