Sanjay Jadhav Parbhani MP | ‘आम्ही बंडू बॉस यांच्यासोबतच राहणार’ ; मानवतमधील शिवसैनिकांचा निर्धार

शहरातील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, माजी पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी आपण खासदार संजय जाधव यांच्या भूमिकेसोबत असल्याचे स्पष्ट केले
Manwath Shiv Sena Workers
दिपक बारहाते, अनिल जाधवPudhari
Published on
Updated on

Manwath Shiv Sena Workers

मानवत : परभणीचे खासदार संजय जाधव उर्फ बंडू बॉस यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बाहेर पडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे पडसाद मानवतमध्येही उमटू लागले आहेत. शहरातील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, माजी पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी आपण खासदार संजय जाधव यांच्या भूमिकेसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांनी दैनंदिन पक्षकार्यात बंडू बॉस यांच्या नेतृत्वाखाली काम केल्याचे सांगत भविष्यातही त्यांच्यासोबतच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. यासंदर्भात त्यांनी दैनिक ‘पुढारी’शी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली.

Manwath Shiv Sena Workers
Parbhani Protest : उपवर्गीकरण रद्दसाठी महामोर्चा

दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासूनच जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला होता. त्याच काळात युवासेना जिल्हाप्रमुख दिपक बारहाते, मानवत तालुकाध्यक्ष माणिक काळे, शहराध्यक्ष अनिल जाधव यांच्यासह इतर काही पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले होते. त्यामुळे आगामी राजकीय बदलांचे संकेत त्यावेळीच मिळाले होते.

खासदार संजय जाधव यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनीही त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. युवासेना जिल्हाध्यक्ष तथा मानवत नगरपरिषदेतील शिवसेनेचे नगरसेवक दिपक बारहाते, तालुकाध्यक्ष माणिक काळे आणि शहराध्यक्ष अनिल जाधव यांनी बंडू बॉस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पुढील राजकीय वाटचाल त्यांच्यासोबतच करण्याचा निर्धार व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news